G20 Summit 2023 Sakal
Personal Finance

G20 Summit 2023: ऋषी सुनक आहेत इतक्या कोटींचे मालक, राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे?

Britain PM Rishi Sunak Net Worth: ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक सध्या G-20 परिषदेसाठी भारतात आहेत.

राहुल शेळके

Britain PM Rishi Sunak Net Worth: ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत. ऋषी सुनक हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंतांपैकी एक आहेत, त्यांची संपत्ती अनेक प्रसिद्ध व्यक्तींपेक्षा जास्त आहे. ऋषी सुनक यांच्या संपत्तीचा अंदाज यावरूनही लावला जाऊ शकतो की ते ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूपेक्षा जवळपास 10 पट श्रीमंत आहेत.

ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक सध्या G-20 परिषदेसाठी भारतात आहेत. रविवारी ते पत्नी अक्षता मूर्तींसह अक्षरधाम मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती हे G-20 शिखर परिषदेत सहभागी होणारे सर्वात श्रीमंत जोडपे आहे. या दोघांकडे अफाट संपत्ती आहे.

ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांच्याकडे अनेक आलिशान घरे, कार आणि महागड्या वस्तू आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची जीवनशैली अतिशय आलिशान आहे. द संडे टाइम्सने श्रीमंतांच्या यादीत ऋषी सुनक यांना 222 वे स्थान दिले होते. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक हे 2001 ते 2004 पर्यंत गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सचे विश्लेषक होते.

ब्रिटनच्या पंतप्रधानांकडे किती संपत्ती आहे?

ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण 756 कोटी रुपयांची संपत्ती आहे, त्यापैकी केवळ ऋषी सुनक यांच्याकडे 178 कोटी रुपयांपेक्षा जास्त (200 दशलक्ष युरो) संपत्ती आहे. सुनक आणि अक्षता मूर्ती यांचे मुख्य निवासस्थान केन्सिंग्टन येथे आहे, जे पाच बेडरूमचे मेव्ह हाउस आहे. त्याची किंमत 7 दशलक्ष युरो आहे.

TOI नुसार, सुनक यांचे नॉर्थ यॉर्कशायरमध्ये 18 कोटी रुपयांचे मॅनर हाऊस आहे, ज्यामध्ये टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल आणि इतर गोष्टी आहेत. त्यांच्याकडे एक पेंटहाऊस देखील आहे, ज्याची किंमत 60 कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे साऊथ केन्सिंग्टनमध्ये हॉलिडे होम आणि 2.46 कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे.

ऋषी सुनक किती गाड्यांचे मालक आहेत?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषी सुनक यांच्याकडे तीन लक्झरी कार आहेत. यामध्ये लँड रोव्हर डिस्कव्हरी, जग्वार एक्सजे आणि फोक्सवॅगन गोल्फ Mk6 GTI चा समावेश आहे. ऋषी सुनक यांनी 2001 मध्ये ऑक्सफर्डच्या लिंकन कॉलेजमधून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT