Ganesh Chaturthi 2023 Bank Holiday Sakal
Personal Finance

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीनिमित्त किती दिवस बँका राहणार बंद? पाहा सुट्ट्यांची यादी

Ganesh Chaturthi 2023 Bank Holiday: गणेश चतुर्थीला अनेक बँकांना सुट्ट्या असणार आहेत.

राहुल शेळके

Ganesh Chaturthi 2023 Bank Holiday: गणेश चतुर्थीचा सण देशभरात थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी हा सण 10 दिवसांचा असणार आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जाणार आहे. या दिवशी देशातील अनेक बँकांना सुट्ट्या असतील तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या असतील.

गणेश चतुर्थीला बँका बंद

गणेश चतुर्थीला काही शहरांमध्ये 18, 19 आणि 20 सप्टेंबरला सुट्ट्या असतील. त्यामुळे विविध राज्यांमध्ये तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, 18 सप्टेंबर रोजी बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि तेलंगणामध्ये वारससिद्धी विनायक व्रत / विनायक चतुर्थी निमित्त सुट्टी असेल.

19 सप्टेंबरला अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी या शहरांमध्ये गणेश चतुर्थी निमित्त बँकांना सुट्टी असेल.

20 सप्टेंबरला बँका कोठे बंद राहतील?

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी 20 सप्टेंबर रोजी भुवनेश्वर आणि पणजीमध्ये सुट्टी असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टीच्या यादीनुसार, सप्टेंबरमध्ये 12 अधिकृत सुट्ट्या असतील (राज्यानुसार बदलू शकतात). याशिवाय रविवार आणि पर्यायी शनिवारची सुटी जोडली तर 16 दिवस बँकांना सुट्टी असेल.

सप्टेंबरमधील इतर सुट्ट्यांची यादी

  • 22 सप्टेंबर 2023- श्री नारायण गुरु समाधी दिन (कोची, पणजी आणि त्रिवेंद्रममधील बँकांना सुट्टी असेल).

  • 23 सप्टेंबर 2023- चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

  • 24 सप्टेंबर 2023- रविवार

  • 25 सप्टेंबर 2023- श्रीमंत शंकरदेव यांची जयंती (गुवाहाटीमधील बँकांना सुट्टी असेल).

  • 27 सप्टेंबर 2023- मिलाद-ए-शरीफ (जम्मू, कोची, श्रीनगर आणि त्रिवेंद्रममध्ये बँक सुट्टी).

  • 28 सप्टेंबर 2023- ईद-ए-मिलाद (अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, तेलंगणा, इंफाळ, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची येथे बँकांना सुट्टी).

  • 29 सप्टेंबर 2023- ईद-ए-मिलाद-उल-नबी (गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT