Gautam Adani becomes asia richest person defeated mukesh ambani know net worth  Sakal
Personal Finance

Gautam Adani: अंबानींना मागे टाकून अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; संपत्तीत झाली 'इतकी' वाढ

Gautam Adani: मुकेश अंबानींना मागे टाकून उद्योगपती गौतम अदानी आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. इतकेच नाही तर गौतम अदानी यांनी जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठी झेप घेतली असून ते 12 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

राहुल शेळके

Gautam Adani: मुकेश अंबानींना मागे टाकून उद्योगपती गौतम अदानी आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. इतकेच नाही तर गौतम अदानी यांनी जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठी झेप घेतली असून ते 12 व्या स्थानावर पोहोचले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीत 24 तासांत 7.6 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासाठी 2024 वर्षाची सुरुवात दणक्यात झाली आहे. गेल्या 4 दिवसांच्या कमाईत अदानी यांनी जगातील सर्व श्रीमंतांना मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानी यांच्या संपत्तीमध्ये या वर्षात आतापर्यंत 13.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. यापैकी 7.67 अब्ज डॉलर्स गुरुवारी वाढले.

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी ते 154 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते.

सप्टेंबर 2022 मध्ये जेव्हा गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले, तेव्हा त्यांची संपत्ती 12.81 लाख कोटी रुपये किंवा 154 अब्ज डॉलर्स इतकी वाढली होती. पण अहवालानंतर त्यांच्या संपत्तीत कमालीची घट झाली आणि ते 25 व्या स्थानावर पोहोचले होते.

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती

गौतम अदानी अब्जाधीशांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर पोहचले आहेत. गुरुवारपर्यंत ते या यादीत 14 व्या क्रमांकावर होते.

मात्र 24 तासांत त्यांनी केलेल्या प्रचंड कमाईमुळे त्यांच्या नेट वर्थमध्ये चांगली वाढ झाली आणि ते 14 व्या स्थानावरून 12 व्या स्थानावर पोहचले. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 97.6 अब्ज डॉलर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Left Handed People Facts: तुम्ही Lefty आहात का? फक्त १०% लोकांमध्ये असतं हे खास ‘ब्रेन कनेक्शन’!

Loni Kalbhor Crime : दिराची सुटका करायची असेल तर मला शरीरसुख दे, नाहीतर त्याला जेलमध्ये सडवतो, अशी धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT