Gautam Adani Birthday: esakal
Personal Finance

Gautam Adani Birthday: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, 106 अब्ज डॉलर्सची संपत्ती, जाणून घ्या गौतम अदानींचा पगार किती?

111 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 12 व्या स्थानावर आहेत

सकाळ डिजिटल टीम

Gautam Adani :

भारतातील श्रीमंत लोकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले उद्योगपती गौतम अदानी यांचा आज जन्मदिवस आहे. गौतम अदानी यांच्या श्रीमंतीचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण तुम्हाला त्यांचा पगार किती आहे हे माहितीय का?

गौतम अदानी यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की, ते कंपनीतील कर्मचाऱ्यांहून कमी पगार घेतात. त्यांचा पगार नक्की किती आहे. याबद्दल माहिती घेऊयात.

आर्थिक वर्ष 31 मार्च 2024 च्या शेवटी अदानींच्या खात्यात एकूण 9.26 कोटी रुपयांचा पगार जमा झाला आहे. हे उद्योगातील त्यांच्या इतर समकक्षांपेक्षा कमी आहे.

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या वार्षिक अहवालात असे दाखवले आहे की, 61 वर्षीय अदानी यांनी 10 उद्योग समूह कंपन्यांपैकी केवळ दोन कंपन्यांकडून पगार घेतला. त्यांच्या समूहाच्या प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) कडून 2023-24 मध्ये पगार म्हणून 2.19 कोटी रुपये लाभ आणि इतर भत्ते म्हणून 27 लाख रुपये मिळाले.

एईएलच्या वार्षिक अहवालानुसार, अदानींचा एकूण पगार मागील आर्थिक वर्ष 2022-23 पेक्षा तीन टक्के अधिक आहे. यावर्षी त्यांचा पगार 2.46 कोटी रुपये इतका आहे. याशिवाय अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेड (APSEZ) कडून अदानींना 6.8 कोटी रुपये वेतन मिळते.

अदानींचा पगार भारतातील सर्वच श्रीमंत उद्योगपतींपेक्षा कमी आहे. देशातील सर्वात श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी कोविड-19 पासून कोणताही पगार घेत नाहीत. यापूर्वी त्यांचा पगार वार्षिक 15 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित होता.

अदानी यांचा पगार इतर क्षेत्रातील उद्योगपतींपेक्षा कमी आहेत. दूरसंचार क्षेत्रातील सुनील मित्तल (2022-23 मध्ये 16.7 कोटी), राजीव बजाज (53.7 कोटी), पवन मुंजाल (80 कोटी), L&T चेअरमन एसएन सुब्रमण्यम आणि इन्फोसिसचे सीईओ सलील एस पारेख यांच्यापेक्षा खूपच कमी आहे.

आकडेवारीनुसार कुणाला किती पगार?

गौतम अदानी - 9.26 कोटी

सुनील मित्तल – 16.7 कोटी

राजीव बजाज – 53.7 कोटी

मुकेश अंबानी – कोणत्याही स्वरूपातील वेतन घेत नाहीत

'ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स'नुसार, अदानीची एकूण संपत्ती $106 अब्ज आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी ते अंबानींशी स्पर्धा करत आहेत. 2022 मध्ये, अदानी सर्वात श्रीमंत आशियाई बनले होते.

अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर, गेल्या वर्षी अदानी समूह कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य $150 अब्जने घसरले. यावर्षी त्यांनी अंबानींना दोनदा मागे टाकले. मात्र, आता ते पुन्हा दुसऱ्या स्थानावर आहेत.

111 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 12 व्या स्थानावर आहेत. या यादीत अदानी 14 व्या स्थानावर आहे. वार्षिक अहवालानुसार अदानीचा धाकटा भाऊ राजेश यांना 8.37 कोटी रुपये पगार मिळातो. तर, पुतणे प्रणव अदानी यांना 4.5 कोटी रुपयांच्या कमिशनसह एकूण 6.46 कोटी रुपये मानधन मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT