Gautam Adani Sakal
Personal Finance

Gautam Adani: गौतम अदानींनी विकत घेतली सिमेंट क्षेत्रातील 'ही' मोठी कंपनी, एवढ्या कोटींना झाली डील

Gautam Adani: गौतम अदानी यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन कंपनीचा समावेश केला आहे.

राहुल शेळके

Gautam Adani: अदानी समूहाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सिमेंट क्षेत्रात आपला दबदबा वाढवत गौतम अदानी यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन कंपनीचा समावेश केला आहे.

संघी सिमेंटचे अधिग्रहण केल्याचे त्यांच्या अंबुजा सिमेंट कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. या करारांतर्गत अंबुजा सिमेंट संघी इंडस्ट्रीजच्या प्रवर्तकांकडून 56.74 टक्के स्टेक घेणार आहे.

शेअर बाजार उघडण्यापूर्वी घोषणा

आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी गुरुवारी शेअर बाजार सुरू होण्यापूर्वीच गौतम अदानी यांच्या कंपनीने हा करार जाहीर केला. कंपनीने संघी इंडस्ट्रीजचे अधिग्रहण केल्याचे सांगितले.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, अंबुजा सिमेंटचा हा सौदा 5,000 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ व्हॅल्यूमध्ये झाला आहे. अंबुजा सिमेंट सध्याच्या प्रवर्तक समूह रवी संघी अँड फॅमिलीकडून बहुसंख्य स्टेक घेणार आहे.

डीलवर गौतम अदानी काय म्हणाले?

अंबुजा सिमेंट आणि संघी इंडस्ट्रीज यांच्यातील या कराराबाबत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, या करारामुळे अंबुजा सिमेंटचा दर्जा बाजारपेठेत मोठा होणार आहे. या संपादनामुळे आम्ही 2028 पर्यंत आमची सिमेंट क्षमता दुप्पट करू.

अदानी यांच्या मते, कंपनी सिमेंट उत्पादनात 140 एमटीपीए लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. संघी इंडस्ट्रीजकडे अब्जावधी टन चुनखडीचा साठा आहे आणि अंबुजा सिमेंट संघीपुरम येथील सिमेंट क्षमता पुढील 2 वर्षांत 15 एमटीपीएपर्यंत वाढवेल.

कराराची घोषणा होताच शेअर्समध्ये तेजी आली

अदानी समूहाच्या सिमेंट क्षेत्रातील प्रमुख कंपनी अंबुजा सिमेंटच्या या व्यवहाराचा परिणाम कंपनीच्या शेअरवरही दिसून येत आहे. शेअर बाजारात घसरण होऊनही अंबुजाचा शेअर तेजीसह व्यवहार करत आहे.

या कराराच्या घोषणेनंतर लगेचच अंबुजा सिमेंटचे शेअर्स गुरुवारी जवळपास एक टक्क्यांनी वाढून 466.6 रुपयांवर पोहोचले होते. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात असलेले संघी इंडस्ट्रीजचे उत्पादन युनिट हे देशातील सर्वात मोठे सिमेंट आणि क्लिंकर युनिट आहे.

अंबुजा सिमेंट्सही येथे करणार गुंतवणूक

गौतम अदानी म्हणाले की संघी इंडस्ट्रीज लिमिटेडशी हातमिळवणी करून अंबुजा सिमेंट या बाजारपेठेत आपले अस्तित्व वाढवत आहे.

यासह पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी आणि बांधकाम साहित्य क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी म्हणून आपले स्थान मजबूत करण्यासाठी सज्ज आहे. ते म्हणाले की अंबुजा सिमेंट मोठ्या संघीपुरम येथील कॅप्टिव्ह बंदराच्या विस्तारासाठी देखील गुंतवणूक करेल.

विशेष म्हणजे, गुजरातमधील सिमेंट क्षेत्रातील तीन प्रमुख कंपन्या अंबुजा-एसीसी, जेके लक्ष्मी सिमेंट आणि अल्ट्राटेक आहेत. संघी इंडस्ट्रीजचे गुजरातमधील नवलखी बंदर आणि महाराष्ट्रातील धरमतर बंदर येथे बल्क सिमेंट टर्मिनल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT