Gautam Adani Sakal
Personal Finance

Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीतून अदाणींची घसरण, थेट तिसाव्या स्थानावर आदळले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः जगभरातल्या श्रीमंतांच्या यादीतून भारतीय उद्योगपती गौतम अदाणी यांची वरचेवर घसरण होत आहे. आज श्रीमंतांच्या यादीमध्ये गौतम अदाणी तिसाव्या स्थानावर घसरले आहेत.

अमेरिकेची संशोधन संस्था हिंडनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर गौतम अदाणींच्या मागे शुक्लकाष्ठ लागलं आहे. दररोज एकामागून एक संकटं अदाणींवर कोसळत आहेत. चालू वर्ष त्यांच्यासाठी खूपच अडचणीचं ठरणार असल्याचं दिसून येत आहे.

जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले अदाणी २४ जानेवारीच्या अहवालानंतर दहाव्या स्थानावर घसरले, त्यानंतर विसाव्या आणि आज ते थेट तिसाव्या स्थानी गेले आहेत. २०२२ मध्ये अदाणींनी जेवढं कमावलं होतं ते एका महिन्यात गमवावं लागलं आहे.

अदाणींच्या नेटवर्थमध्ये घसरण होत असल्याने जगभारतील श्रीमंतांमध्ये त्यांचा दबदबा कमी होत चालला आहे. मागच्या वर्षी २०२२ मध्ये झटपट कमाई करत अदाणी जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले होते. मात्र वर्षाअखेरीस चौथ्या स्थानापर्यंत खाली आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक भेटीला, मनोज जरांगे पाटील मोर्चावर ठाम; मुंबईतील आंदोलनाआधी घडामोडींना वेग

Maratha Reservation: जामखेडमध्ये ‘चलो मुंबई’चा नारा: अखंड मराठा समाजातर्फे शहरात बैठक; तालुक्यातून जाणार हजारो बांधव

OTT Plan : चक्क नेटफ्लिक्स अन् अमेझॉन प्राइम दोन्ही फ्री! 'या' बड्या कंपनीने आणली जबरदस्त ऑफर

Chh. Sambhajinagar: भरधाव कारने दुचाकीला उडवले, एक तरुण ठार; चिकलठाण्यात जालना रोडवर पहाटे ‘हिट ॲण्ड रन’, अपघातात तिघे जखमी

Gold Rate Today: सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या भावात मोठी वाढ; काय आहे आजचा भाव?

SCROLL FOR NEXT