Gautam Adani Sakal
Personal Finance

Gautam Adani: अदानींवरील संकट आणखी गडद, पुन्हा विकले 8,700 कोटींचे शेअर्स, काय आहे कारण?

Gautam Adani: अदानी समूहाने बुधवारी 8,700 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. यातील अर्धा भाग GQG भागीदारांनी विकत घेतला होता.

राहुल शेळके

Gautam Adani: शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी रोजी अदानी समूहावरील अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये अदानी ग्रुपवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत परंतु या आरोपांमुळे कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अहवालानंतर ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी अनेक कंपन्यांमधील हिस्सेदारी विकली आहे. बुधवारी अदानी समूहाने अदानी पॉवरमधील आठ टक्क्यांहून अधिक हिस्सा विकला आहे.

पुन्हा एकदा राजीव जैन यांच्या नेतृत्वाखालील GQT Partnersने अदानी समूहाचे शेअर्स खरेदी केले आहेत. या अमेरिकन कंपनीने जानेवारीपासून अदानी ग्रुपमध्ये 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

अदानी समूहाने बुधवारी 8,700 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. यातील अर्धा भाग GQG भागीदारांनी विकत घेतला होता. या कंपनीने आतापर्यंत अदानी समूहाच्या पाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

अदानी पॉवर व्यतिरिक्त, अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पोर्ट्समध्ये त्यांचा हिस्सा आहे. यासोबतच कंपनीची अंबुजा सिमेंट्समध्येही भागीदारी आहे. मात्र त्यांनी हे भागभांडवल अदानी समूहाकडून विकत घेतलेले नसून थेट बाजारातून उभा केले आहे.

अदानी पॉवर ही देशातील सर्वात मोठी कोळसा वीज निर्मिती कंपनी आहे. GQG ने अदानी पॉवर कंपनीचे 152 दशलक्ष शेअर्स 4,240 कोटी रुपयांना खरेदी केले. GQG ची अदानी पॉवरमधील ही पहिली गुंतवणूक आहे परंतु अदानी समूहातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

हिंडेनबर्ग संशोधन अहवाल येण्यापूर्वी अदानी समूहाचे मार्केट कॅप 19.2 लाख कोटी रुपये होते. मात्र अहवाल आल्यानंतर त्यात मोठी घट झाली. 2 मार्च रोजी ते 7.9 लाख कोटी रुपये झाले.

परंतु GQG भागीदारांच्या गुंतवणुकीनंतर त्याला गती मिळाली आणि 28 जून रोजी ती 10.3 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. तेव्हापासून GQG भागीदारांनी अदानी समूहामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गोळीबारावरून सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांनी शहराचे पालकत्व घ्यावे!

Space Mission: भारताने इतिहास घडविल्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर अवकाशात

ट्रम्प यांचा भारताला पुन्हा दणका? २५ टक्के टॅरिफ लावण्याच्या हालचाली; आणखी ६ देश रडारवर

SCROLL FOR NEXT