GDP modi Esakal
Personal Finance

भारताचा GDP वृद्धीदर आला समोर; पंतप्रधान मोदींकडून समाधान व्यक्त

सर्वाधिक वाढ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रिमध्ये (१३.९ टक्के) झाली आहे. मागील तिमाहीमध्ये याच काळावधीमध्ये या क्षेत्राचा वृद्धीदर ३.८ टक्के होता.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी वृद्धीदर ७.६ नोंदला गेला आहे. सरकारने याची आकडेवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भाष्य केलं आहे. ७.६ टक्के जीडीपी वृद्धी दर हा भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता दाखवतो, असं मोदी म्हणाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. (GDP Quarter 2 growth numbers display Indian economy resilience says PM as economy grows 7 point 6 percent in September quarter)

२०२३-२४ सालातील जुलै-सप्टेंबर दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वृद्धीदर भारतीय अर्थव्यवस्थेतील लवचिकता आणि मजबूतपणा दाखवतो. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता हे सकारात्मक चित्र आहे. नवी संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी आम्ही देश वेगाने प्रगती करेल हे पाहत राहू, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मागील वर्षी याच तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी विकास दर ५.४ टक्के होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने अंदाज व्यक्त केलेल्या संख्येनुसार जुलै-सप्टेंबरमधील जीडीपी वृद्धी दर जास्त आहे. २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारताचा विकास दर ७.८ टक्के होता.

सर्वाधिक वाढ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रिमध्ये (१३.९ टक्के) झाली आहे. मागील तिमाहीमध्ये याच काळावधीमध्ये या क्षेत्राचा वृद्धीदर ३.८ टक्के होता. पहिल्या तिमाहीमध्ये तो ४.७ टक्के होता. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीमध्ये चांगली वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्थांना घरघर लागली असताना भारतीय अर्थव्यवस्था चांगली काम करत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

Gold Rate Today: सोन्याच्या भाव कोसळले! अमेरिकेच्या इराणवरील कारवाईचा परिणाम; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Randhir Singh: क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे निधन; प्रदीर्घ आजाराने ७९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

SCROLL FOR NEXT