Gold Exchange sakal
Personal Finance

Gold Exchange : जुने देऊन नवीन दागिन्यांना पसंती ; सुमारे ४५ टक्के ग्राहकांचा कल

गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्याने सोने खरेदी करण्याचे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. मात्र, अपरिहार्य कारणांमुळे सोने घ्यावेच लागणार असेल तर अनेकांची पसंती जुने सोने देऊन नवीन दागिने खरेदी करण्याकडे आहे.

सनील गाडेकर, सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्याने सोने खरेदी करण्याचे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. मात्र, अपरिहार्य कारणांमुळे सोने घ्यावेच लागणार असेल तर अनेकांची पसंती जुने सोने देऊन नवीन दागिने खरेदी करण्याकडे आहे. त्यामुळे जुने सोने देऊन नवीन दागिने घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

लग्नसराईनिमित्ताने सोन्याची खरेदी वाढली आहे. भाव वाढल्याने ठराविक रकमेचे सोने खरेदी केले जात आहे. किती सोने घ्‍यायचे, यापेक्षा किती रुपयांचे सोने घ्‍यायचे हे ग्राहक ठरवून येत आहेत. जुने सोने देऊन नवीन दागिने घेणाऱ्यांची संख्या वर्षभरापर्यंत २५ टक्के होती. आता ४० ते ४५ टक्के ग्राहक जुने सोने घेऊन आलेले असतात. सोन्याला आपल्याकडे असलेले महत्त्व व ते सहजासहजी न मोडण्याची मानसिकता यामुळे हा आकडा वाढला आहे, अशी माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.

फॅन्सी दागिने करणारे सर्वाधिक

आजी किंवा आई; तसेच सासूचे दागिने जुन्या पद्धतीचे आहेत. त्या दागिन्यांची फॅशन गेल्याने ते वापरात नाहीत. त्यामुळे नवनवीन फॅन्सी आणि नाजूक दागिने बनविण्यास महिलांची पसंती मिळत आहे. जुने सोने देऊन नवीन दागिने खरेदी करणाऱ्यांना सराफ व्यवसायिकांकडून चांगल्या सवलती दिल्या जात आहेत. त्याचा फायदा घेत अनेक जण जुन्याचे नव्या सोन्यात रूपांतर करून घेत आहेत.

काय आहेत कारणे...

गेल्या काही दिवसांत सोन्याचा वाढलेला भाव

जुने झालेले दागिने वापरात आणण्यासाठी त्यांच्यात बदल करणे

सातत्याने फॅन्सी दागिने वापरण्याची आवड

नव्या घडणावळीवर सराफ व्यावसायिकांकडून सवलत

गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचा वाढलेला भाव आणि वापरात नसलेले सोने पुन्हा वापरात आणण्यासाठी जुने सोने देऊन नवीन दागिने घेतले जात आहेत. पूर्वी २५ टक्के ग्राहक जुने सोने घेऊन येत असत. आता तो आकडा ४५ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मोडलेल्या सोन्यातून फॅन्सी दागिने बनवून घेतले जात आहेत.

- डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स

माझ्या आईने मला तीन वर्षांपूर्वी तिचे काही दागिने दिले होते. ते दागिने मोडून मी आता माझ्या मुलीला तिच्या लग्नासाठी नवीन दागिने बनवत आहे. सध्या सोन्याचा भाव वाढलेला आहे. त्यामुळे आम्ही एका ठराविक रकमेचे नवे आणि जुने दागिने देऊन मुलाला आवश्यक असलेले दागिने बनविले आहेत.

- आशा सपकाळे, दागिने खरेदीसाठी आलेल्या गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

Tribal Students Protest : चर्चा फिस्कटल्याने आदिवासी विद्यार्थ्यांकडून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा; नव्याने दोन अत्यवस्थ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

Marathi News Live Updates : तरुण तेजपाल यांना तीन आठवड्यांच्या आत शरणागती पत्करण्याचे आणि शरणागतीचे प्रमाणपत्र न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश

Jalkot Water Supply : जळकोटचा पाणीप्रश्न सुटणार; ६२ कोटींच्या नवीन जलवाहिनी व नळयोजनेला नगरपंचायतीची मंजुरी

SCROLL FOR NEXT