Giving away Rs 5.6 cr a day, Shiv Nadar top donor in 2023 philanthropy rankings  Sakal
Personal Finance

Top Donor: दिवसाला ५.६ कोटी रुपये दान करणारा दानशूर व्यक्ती आहे तरी कोण?

Top Donor: एचसीएल टेकचे शिव नाडर देशातील सर्वांत दानशूर व्यक्ती वार्षिक २,०४२ कोटी रुपयांची देणगी

राहुल शेळके

Top Donor: देशातील सर्वांत दानशूर व्यक्ती म्हणून यंदा एचसीएल टेकचे संस्थापक शिव नाडर यांनी अव्वल स्थान मिळविले आहे. त्यांनी वार्षिक २,०४२ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यांनी दान कोषात सरासरी प्रतिदिवस ५.६ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.

देशभरात १९९ व्यक्तींनी वर्षभरात ८,४४५ कोटी रुपयांची देणगी दिली, जे आर्थिक वर्ष २०२२ मधील १०८ व्यक्तींनी केलेल्या दानकर्मापेक्षा ५९ टक्क्यांनी अधिक आहे. भारतातील परोपकारकर्त्यांची २०२३ मधील (१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३) यादी ‘एडेलगिव्ह हुरून’ यांनी गुरुवारी प्रसिद्ध केली. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

दानकार्यात आघाडीवर असणारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी विप्रोचे अझीम प्रेमजी हे या सूचीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी १,७७४ कोटी रुपयांचे वार्षिक दानकार्य केले आहे. देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी ३७६ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

यंदा या यादीत दलाली संस्था असलेल्या झिरोधाचे निखिल कामथ हे सर्वात तरुण दानकार्य करणारे ठरले आहे. यादीत १२ व्या स्थानावर असलेल्या कामथ बंधूंनी वर्षभरात ११० कोटी रुपयांचे दानकार्य केले.

रोहिणी नीलेकणी यांनी सरलेल्या वर्षात १७० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्या या यादीत दहाव्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ अनु आगा (४० व्या स्थानावर) आणि लीना गांधी (४१ व्या स्थानावर) यांनी प्रत्येकी २३ कोटी रुपयांचे दानकर्म केले आहे.

या यादीत एकूण सात महिला समाजसेवी व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. यंदा भारतात एकूण १४ व्यक्तींनी १०० कोटी रुपयांहून अधिक वार्षिक देणगी दिली, २४ जणांनी ५० कोटी रुपयांहून अधिक आणि ४७ जणांनी २० कोटी रुपयांहून अधिक देणगी दिली असल्याचे हुरूनने तयार केलेली सूची दर्शविते.

मुंबई आघाडीवर…

देशातील सर्वात दानशूर लोकांच्या यादीत मुंबई आघाडीवर असून दानधर्म केलेल्यांपैकी ३९ व्यक्ती मुंबईतील आहे. त्यानंतर नवी दिल्ली १९ टक्के आणि बेंगळूरु १३ व्यक्तींसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थनावर आहे.

कुमार मंगलम बिर्ला, गौतम अदानी, बजाज कुटुंब, अनिल अग्रवाल, नंदन नीलेकणी आणि सायरस आणि अदार पूनावाला यांचा आघाडीच्या १० परोपकारी व्यक्तींमध्ये समावेश आहे.

कोणत्या क्षेत्रासाठी किती योगदान?

शिक्षण क्षेत्रासाठी

६२ परोपकारी व्यक्तींनी एकत्रितपणे १,५४७ कोटी रुपयांचे योगदान दिले आहेत.

कला क्षेत्रासाठी

१,३४५ कोटी रुपये

आरोग्य सेवांसाठी

६३३ कोटी रुपये मिळाले आहेत.

आर्थिक वर्ष २०२० मध्ये दानशूर व्यक्तींनी एकत्रितपणे ११,९८४ कोटी रुपयांचे दानकर्म केले होते. तर आर्थिक वर्ष २०२१ मध्येते ते १४,७५५ कोटी रुपये राहिले होते. सरलेल्या वर्षात मात्र ते ८,४४५ कोटी रुपयांवर मर्यादित राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : नवीन वर्षाची सुरुवात हुडहुडीने ! महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार, तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

तरुणांनो तयारीला लागा, पोलिस भरतीची फेब्रुवारीपासून मैदानी! राज्यात एका पदासाठी ११३ उमेदवार; सोलापूर शहरात जागा ७९ अन्‌ अर्ज ४१५१; बँड्‌समनसाठी एक तृतीयपंथी

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिकासाठी आता बाह्य परीक्षकांमध्ये अदलाबदल; बोर्डाकडून पहिल्यांदाच मोठा बदल; शिक्षणाधिकाऱ्यांची पथके करणार पडताळणी

Panchang 31 December 2025: वर्षाच्या शेवटच्या दिवशी विष्णुसहस्रनामस्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

महाबळेश्वर हादरलं! कंटेनरमध्‍ये गुदमरून दोघांचा मृत्‍यू; मजुरांनी थंडी घालवण्यासठी शेगडी पेटवली अन् विपरीत घडलं..

SCROLL FOR NEXT