Godrej Group Sakal
Personal Finance

Godrej Group: 127 वर्ष जुन्या गोदरेज ग्रुपमध्ये वाटण्या सुरु; कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे प्रकरण?

Godrej Group: देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या गोदरेज ग्रुपमध्ये फूट पडू लागली आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांच्या कंपन्यांच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला आहे आणि आता लवकरच शेअर्सची देवाणघेवाण केली जाईल.

राहुल शेळके

Godrej Group: देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या गोदरेज ग्रुपमध्ये फूट पडू लागली आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांच्या कंपन्यांच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला आहे आणि आता लवकरच शेअर्सची देवाणघेवाण केली जाईल. 2.34 लाख कोटी रुपयांचा गोदरेज समूह 1897 मध्ये सुरू झाला.

आता या 127 वर्ष जुन्या व्यावसायिक ग्रुपमध्ये विभागणी सुरू झाली आहे. अहवालानुसार, नादिर आणि आदि गोदरेज यांनी बोर्डाचा राजीनामा दिला आहे आणि जमशेद गोदरेज यांनी गोदरेज प्रॉपर्टीज आणि गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या बोर्डावरील आपली जागा सोडली आहे. असे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.

विभाजन कोणामध्ये होत आहे?

या विभाजनापूर्वी गोदरेज कुटुंबात दोन व्यावसायिक गट तयार झाले होते. यापैकी एक गट म्हणजे गोदरेज इंडस्ट्रीज अँड असोसिएट्स. ज्याला आदि गोदरेज आणि त्याचा भाऊ नादिर गोदरेज सांभाळतात. दुसरीकडे, गोदरेज आणि बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आदि गोदरेजचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज आणि स्मिता गोदरेज सांभाळतात.

'या' 5 कंपन्या शेअर बाजारात लिस्ट आहेत

  • गोदरेज इंडस्ट्रीज

  • गोदरेज कन्‍झ्युमर प्रॉडक्ट

  • गोदरेज ऍग्रोव्हेट

  • एस्टेक लाइफ सायन्सेस

  • गोदरेज प्रॉपर्टीज

(18 एप्रिल रोजी मार्केट कॅप 2.74 लाख कोटी रुपये होते)

ब्रँडचे नाव कोणाकडे जाईल?

गोदरेज फॅमिली कौन्सिल काही महत्त्वाच्या गोष्टींवर काम करत आहे, ज्यामध्ये दोन महत्त्वाच्या मुद्यांचा समावेश आहे. प्रथम, विभाजनानंतर गोदरेज ब्रँडचे नाव कोण वापरेल. आणि त्यासाठी संभाव्य रॉयल्टी पेमेंट काय असेल. त्याचप्रमाणे गोदरेज आणि बॉयस यांच्या मालकीच्या जमिनीचे मूल्यांकन काय असेल. कारण सुमारे 3400 एकर जमीन दोन कुटुंबांमध्ये विभागली जाणार आहे.

गोदरेजची अशी झाली होती सुरुवात

1.76 लाख कोटी रुपयांचा गोदरेज समूह 1897 मध्ये सुरू झाला. गोदरेज ग्रुपने कुलूप विकून सुरुवात केली. याच समूहाने 1897 मध्ये भारतातील पहिले लीव्हर तंत्रज्ञान तयार केले होते. अर्देशीर गोदरेज आणि पिरोजशा बुर्जोरजी गोदरेज या दोन भावांनी हा ग्रुप सुरू केला होता.

गोदरेज समूहाचा व्यवसाय कोणत्या क्षेत्रात पसरलेला आहे?

आज, गोदरेज समूह अभियांत्रिकी, उपकरणे, सुरक्षा, कृषी उत्पादने, रिअल इस्टेट आणि ग्राहक उत्पादनांसह अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, या सर्व क्षेत्रांमध्ये पसरलेला व्यवसाय विभागला जाऊ शकतो. मात्र, आतापर्यंत या विभाजनावर गोदरेज ग्रुपकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT