Gold Silver Price Today Latest Update 22 January 2024 Sakal
Personal Finance

Gold Rate: अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापने दिवशी सोन्याचे भाव गगनाला भिडले

Gold Silver Price Today: उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे नव्याने बांधलेल्या भव्य राम मंदिराचे उद्घाटन आणि राम लल्लाच्या सोहळ्याचा कार्यक्रम एका शुभ मुहूर्तावर पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुभ मुहूर्तानुसार मंदिराच्या गर्भगृहात प्रभू रामलल्लाचा अभिषेक केला.

राहुल शेळके

Gold Silver Price Today Latest Update 22 January 2024: उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे नव्याने बांधलेल्या भव्य राम मंदिराचे उद्घाटन आणि राम लल्लाच्या सोहळ्याचा कार्यक्रम एका शुभ मुहूर्तावर पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुभ मुहूर्तानुसार मंदिराच्या गर्भगृहात प्रभू रामलल्लाचा अभिषेक केला.

आज अयोध्या राम मंदिराच्या सोहळ्या दिवशी सोन्याचा भाव 63 हजार रुपयांच्या वर आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,200 रुपयांच्या वर आहे. चेन्नईत सोन्याचा भाव 63,550 रुपये आहे. चांदीचा भाव 75,500 रुपये आहे. जाणून घ्या देशातील शहरांमधील सोन्याचे भाव.

मुंबईत आजचा सोन्याचा भाव

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 24 कॅरेटसाठी ग्राहकांना 63,050 रुपये प्रति 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील. (Today's gold rate in Mumbai)

चेन्नईत आजचा सोन्याचा भाव

चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Today's gold rate in Chennai)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • कोलकत्ता - 63,050 रुपये

  • हैदराबाद - 63,050 रुपये

  • मुंबई - 63,050 रुपये

  • पुणे - 63,050 रुपये

  • पटना - 62,770 रुपये

(Know the price of 10 grams of gold for 24 carat)

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.(How to determine purity of gold)

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. ( What is the difference between 22 and 24 carats? )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe on MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! थेट 'या' ९ परीक्षांची होणार कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपूर्वी पुरावे देण्याचे कडक आवाहन

Israel Election: इस्रायल निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही! नव्या राजकीय पेचप्रसंगाचा भारतासह इराण आणि गाझावर काय परिणाम होणार?

Pandharpur News : ऊस दरावरून पंढरपूरात वाद चिघळला; विठ्ठल कारखान्यावर आमदार अभिजीत पाटील समर्थक विरुद्ध शेतकरी संघटना आमने-सामने

IND vs NZ, 4th T20I: वैभव सूर्यवंशीला बाकावर बसवणं महागात पडलं? आधी फिलिप्सने चोपलं अन् मग गोलंदाजांनी सतावलं; भारताचा न्यूझीलंडकडून दारुण पराभव

India U-19 squad for Asia Cup: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर! ज्युनियर सेहवाग, द्रविडची निवड; India vs Pakistan सामन्यात धुमाकूळ घालण्यास सज्ज

SCROLL FOR NEXT