Personal Finance

Gold And Silver Rate: सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, चांदीही महागली; वाचा काय आहेत आजचे दर !

Latest Gold and Silver Rate: ३० ऑगस्टला चांदी ८५ हजार रुपये (प्रतिकिलो) होती. आज चांदी ९३ हजारांवर पोचली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold And Silver Latest RAte| सध्या जागतिक स्तरावर अस्थिर वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी सोने व चांदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. शनिवारी (ता. २८) सोने प्रति १० ग्रॅम ७८ हजार ३८३ रुपये (जीएसटीसह) आणि चांदी प्रतिकिलो ९७ हजार ६५० (जीएसटीसह) रुपयांपर्यंत जाऊन पोचली आहे.

सध्या पितृपक्ष सुरू आहे. यात शुभकार्य केले जात नाही. सोबतच काही वस्तू खरेदीलाही हा काळ योग्य नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील सराफा व्यवसायात सध्या दागिन्यांची मागणी तीस ते चाळीस टक्के कमी झाली आहे. नवरात्रोत्सवापासून दागिने खरेदी केले जातील. आणखी दर वाढण्याच्या शक्यतेने सध्या गुंतवणूकदार सक्रिय झाले आहेत. यंदा चांदीच्या दरात महिनाभरात आठ हजारांची वाढ झाली. ३० ऑगस्टला चांदी ८५ हजार रुपये (प्रतिकिलो) होती. आज चांदी ९३ हजारांवर पोचली आहे. जीएसटीसह चांदी ९७ हजार ६५० रुपयांवर पोचली आहे.

जागतिक स्तरावर युद्ध सुरू असून, हे सध्यातरी थंड होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. गुंतवणूकदारांना या काळात सोने-चांदीत गुंतवणुकीची मोठी संधी आहे. दसरा दिवाळीत सोने, दरात मोठी वाढ होऊ शकते.

- सुशील बाफना, संचालक, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव

महिनाभरात सोन्याच्या दरात साडेचार हजारांनी वाढ

■ ता. ३० ऑगस्टला सोने ७३ हजार रुपयांना (प्रति १० ग्रॅम) होते. मागील २८ दिवसांत सोन्याच्या दरात चार हजार ५०० रुपयांची तेजी आली. आज शनिवारी (ता. २८) ७६ हजार १०० रुपये दर होता. तीन टक्के जीएसटीसह सोने ७८ हजार ३८३ वर पोचले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT