Gold  Sakal
Personal Finance

सरकार सोन्याबाबतचा निर्णय मागे घेणार या भीतीने दागिन्यांची विक्री वाढली; बाजारात 6 महिन्यांचे आगाऊ बुकिंग

Gold Demand Surges: 2024 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे स्वस्त दरात सोने खरेदी करण्यासाठी लोकांनी ज्वेलर्सच्या दुकानांवर गर्दी केली आहे.

राहुल शेळके

Gold Demand: 2024च्या अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे स्वस्त दरात सोने खरेदी करण्यासाठी लोकांनी ज्वेलर्सच्या दुकानांवर गर्दी केली आहे. लग्नसोहळ्यासाठी लोकांनी आतापासूनच सोन्याची खरेदी सुरू केली आहे.

दुसरीकडे सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, सोन्याची मागणी वाढल्याने किमतींवरील कस्टम ड्युटीचा निर्णय मागे घेतला जाऊ शकतो, अशी भीतीही काही लोकांना वाटत आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या कमी दराचा फायदा घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळपासूनच लोक दागिन्यांच्या दुकानात येऊ लागले.

प्रत्यक्षात अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सोन्याचा भाव 74,000 रुपये प्रति ग्रॅमच्या विक्रमी पातळीवरून 70,000 रुपयांच्या खाली आला आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 69,950 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,150 रुपये आहे.

सोन्याची ग्राहकांकडून आगाऊ बुकिंग

अर्थसंकल्पानंतर सोन्याचा भाव मंगळवारी 72,609 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून घसरून बुधवारी 69,194 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला. सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क 15% वरून 6% पर्यंत कमी केल्यानंतर 3,415 रुपयांची ही घसरण झाली.

सोने-चांदीच्या खरेदीबाबत परिस्थिती अशी आहे की, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या विवाहसोहळ्यांसाठी ग्राहक आधीच दागिन्यांची ऑर्डर देत आहेत. काही लोक धनत्रयोदशी आणि दिवाळी सणांसाठी ऑर्डर देत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, ज्वेलर्स सोन्यावर आगाऊ बुकिंग योजना आणत आहेत.

कारागिरांच्या सुट्ट्या रद्द

सोन्या-चांदीची मोठी मागणी पाहता ज्वेलर्सनी कारागिरांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. कारण, कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे दैनंदिन मागणी 20% वाढली आहे. या सणासुदीत दागिन्यांची विक्री चांगली होईल, अशी आशा सोने-चांदी व्यापाऱ्यांना आहे.

सोन्यात गुंतवणूक करावी का?

अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या भावात घसरण झाली असल्यामुळे गुंतवणूकदारांचा कल सोने खरेदीकडे आहे. पण घसरणीच्या काळात प्रत्यक्ष सोनं खरेदी करण्याऐवजी गोल्ड ईटीएफ, गोल्ड फंड, सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB), सोने बचत योजना यांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

नोंद - सोने-चांदी, क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT