gold imports surge 26.7 to 35. 95 billion dollar  Sakal
Personal Finance

सोन्याची आयात 26.7 टक्क्यांनी वाढून 35.95 अब्ज डॉलरवर; भारताला 'या' देशातून मिळते सर्वाधिक सोने

Gold Import Increased: भारताची सोन्याची आयात 26.7 टक्क्यांनी वाढून 35.95 अब्ज डॉलर झाली आहे. सोन्याच्या आयातीचा देशाच्या चालू खात्यातील तूटीवर (CAD) वर परिणाम होतो. सरकारी आकडेवारीनुसार, मागणी वाढल्याने आयात वाढली आहे.

राहुल शेळके

Gold Import Increased: भारतात सोन्याचे खूप आकर्षण आहे. प्रत्येकाला सोने खरेदी करायचे असते. लग्न असो वा वाढदिवस, प्रत्येक शुभ प्रसंगी सोने खरेदी केले जाते. दिवाळी आणि धनत्रयोदशीलाही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होते. पण भारतीयांचे सोन्यावरचे हे प्रेम अर्थव्यवस्थेला मारक आहे.

याचे कारण भारताची सोन्याची आयात 26.7 टक्क्यांनी वाढून 35.95 अब्ज डॉलर झाली आहे. सोन्याच्या आयातीचा देशाच्या चालू खात्यातील तूटीवर (CAD) परिणाम होतो. सरकारी आकडेवारीनुसार, मागणी वाढल्याने आयात वाढली आहे.

भारतात सर्वाधिक सोने कोणत्या देशातून येते?

वर्षभरापूर्वी याच काळात सोन्याची आयात 28.4 अब्ज डॉलर होती. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2023 मध्ये या मौल्यवान धातूची आयात 156.5 टक्क्यांनी वाढून तीन अब्ज डॉलरवर गेली आहे. स्वित्झर्लंड हा सोन्याच्या आयातीचा सर्वात मोठा स्त्रोत आहे, ज्याचा वाटा सुमारे 41 टक्के आहे.

त्यानंतर संयुक्त अरब अमिराती (सुमारे 13 टक्के) आणि दक्षिण आफ्रिका (सुमारे 10 टक्के) यांचा क्रमांक लागतो. देशाच्या एकूण आयातीत या सोन्याचा वाटा पाच टक्क्यांहून अधिक आहे. सध्या सोन्यावर 15 टक्के आयात शुल्क आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे.

सोन्याची आयात प्रामुख्याने ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी केली जाते. या कालावधीत रत्ने आणि दागिन्यांची निर्यात 16.16 टक्क्यांनी घसरून 24.3 अब्ज डॉलरवर आली आहे.

भारताची चालू खात्यातील तूट कमी झाली

गेल्या वर्षी 26 डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारताची चालू खात्यातील तूट या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत GDPच्या एक टक्के किंवा 8.3 अब्ज डॉलर इतकी झपाट्याने कमी झाली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे व्यापारी तूट कमी होणे आणि सेवा निर्यातीत झालेली वाढ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT