Gold likely to touch Rs 70,000 in 2024, say experts  Sakal
Personal Finance

Gold Rate: नवीन वर्षात सोन्याची चमक वाढणार; भाव 70 हजारांच्यावर जाणार, काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Gold Rate: नवीन वर्षात सोन्याची चमक वाढणार आहे. पुढील वर्षी सोन्याचा भाव 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या मते, रुपयाची स्थिरता, भू-राजकीय अनिश्चितता आणि जागतिक आर्थिक कमी असल्यामुळे सोन्याचे आकर्षण नवीन वर्षातही कायम राहील.

राहुल शेळके

Gold Rate: नवीन वर्षात सोन्याची चमक वाढणार आहे. पुढील वर्षी सोन्याचा भाव 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या मते, रुपयाची स्थिरता, भू-राजकीय अनिश्चितता आणि जागतिक आर्थिक घसरण झाल्यामुळे सोन्याचे आकर्षण नवीन वर्षातही कायम राहील. सध्या सोन्याचा भाव 63,060 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे

2023 मध्ये सोन्याच्या भावात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. या वर्षी देशांतर्गत बाजारात सोन्याने पहिल्यांदा 4 मे रोजी 61,845 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला. जागतिक बाजारात ते 2,083 प्रति औंस डॉलर या नवीन उच्चांकावर पोहोचले.

त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी सोन्याने 61,914 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत, कॉमट्रेंड्झचे संशोधन संचालक ज्ञानशेखर त्यागराजन म्हणतात की, सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याचे आकर्षण कायम आहे.

(Gold likely to touch Rs 70,000 in 2024, say experts)

त्यामुळे यावर्षी 4 डिसेंबर रोजी सोन्याने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आणि भाव 64,063  रुपये प्रति 10 ग्रॅम असा नवा विक्रम गाठला.

रुपया घसरणार:

ज्ञानशेखर त्यागराजन म्हणाले की 2024 मध्ये देशांतर्गत बाजारात सोने 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते. 2024 च्या निवडणूक वर्षात रुपयात घसरण होऊ शकते. यामुळे देशांतर्गत पातळीवर सोन्याचे भाव वाढतील. भारतात 2024 साली सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. याशिवाय नवीन वर्षात इतर अनेक देशांमध्येही निवडणुका होणार आहेत.

ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (GJC) अध्यक्ष संयम मेहरा म्हणाले की, सोन्याच्या भावातील चढ-उतारांमुळे विक्रीवर परिणाम झाला आहे आणि यावर्षी 30-35 लाख लग्ने झाली असली तरी सोन्याचा व्यवसाय कमी-अधिक प्रमाणात 2022 प्रमाणेच राहीला.

ते पुढे म्हणाले की, 2024 मध्ये यूएस सेंट्रल बँकेने व्याजदरात कपात करणे, सततचा भू-राजकीय तणाव आणि रुपयातील घसरण यामुळे सोन्याचे भाव वाढू शकतात. देशांतर्गत बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 68,000-70,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT