Why Are Gold, Silver Prices Flirting With Record Highs
Why Are Gold, Silver Prices Flirting With Record Highs Sakal
Personal Finance

Explainer: सोन्याने गाठला उच्चांक! सोन्याचे भाव का वाढत आहेत; त्याची कारणे काय आहेत?

राहुल शेळके

Why Are Gold, Silver Prices Flirting With Record Highs: जगभरातील समृद्धीचे प्रतीक असलेले सोने प्राचीन काळापासून लोकांना आकर्षित करत आहे. भारतात सोन्याला विशेष महत्त्व आहे. कोणताही मोठा सण असो वा लग्न, भेटवस्तू म्हणून सोन्याचे दागिने दिल्याशिवाय तो पूर्ण होत नाही. एवढेच नाही तर 'सेफ ॲसेट' म्हणून सोन्याची वेगळी ओळख आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांत सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 7 वर्षात सोन्याचा भाव दुपटीने वाढला आहे. भविष्यातही भाववाढ कायम राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सोन्याच्या भावाने विक्रमी उच्चांक गाठला असताना, सोन्याचे भाव का वाढत आहेत त्याची कारणे काय आहेत? जाणून घेऊया

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या भाव ज्या वेगाने वाढत आहेत, त्यामुळे यंदाच्या दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव 74,000 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे जाऊ शकतात. जागतिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने लवकरच 2,350 ते 2,400 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचेल.

सोन्याच्या भावात झालेल्या वाढीमुळे ज्यांच्याकडे आधीच सोने आहे अशा लोकांना फायदा झाला आहे. कारण 5 वर्षांपूर्वी एखाद्याने सोन्यात गुंतवणूक केली असेल तर त्याचे पैसे जवळपास दुप्पट झाले आहेत. त्याचबरोबर ज्यांनी गोल्ड बाँड, गोल्ड ईटीएफ, सोन्याची नाणी किंवा दागिने खरेदी केले त्यांनाही या वाढलेल्या भावाचा फायदा झाला आहे. आणखी एक फायदा म्हणजे सोन्यावर अधिक सोने कर्ज उपलब्ध होईल. भावात झालेल्या वाढीमुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतील.

अनेकांना इच्छा असूनही सोने खरेदी करता येत नाही. लग्नसराईचा हंगाम असल्याने सोने खरेदी करणाऱ्यांचे बजेट वाढणार आहे. सोन्याचे भाव वाढल्याने दागिन्यांच्या व्यवसायावरही परिणाम होणार आहे. यामुळे दागिन्यांची मागणी कमी होईल अशी शक्यता तज्ज्ञांना वाटत आहे.

सोन्याच्या भाववाढीमागे अनेक कारणं आहेत त्यामध्ये जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोन्याची मोठी खरेदी केली जात आहे. सध्या केंद्रीय बँकांकडे 1,037 टन सोन्याचा साठा आहे. तसेच इस्रायल, हमास, रशिया आणि युक्रेनसह पश्चिम आशियातील तणाव वाढण्याच्या भीतीने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत आहे.

लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने भारतात सोन्याला मोठी मागणी आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमजोर रुपयामुळे सोन्याची आयात महाग झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.

2020 मध्ये, कोरोनामुळे सोन्याने नवा उच्चांक गाठला. लॉकडाऊनमुळे अनिश्चितता आणि मंदीची भीती यामुळे सोन्याची चमक वाढली. सध्या सुरू असलेला हा ट्रेंड थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. जगभरातील वाढत्या तणावामुळे केंद्रीय बँकाही मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत. त्यामुळे मागणी झपाट्याने वाढल्याने भावात वाढ होत आहे.

तसेच भारतातील लोकांना सोन्याबद्दल विशेष प्रेम आहे. भारतात गुंतवणुकीचे माध्यम म्हणूनही सोन्याला अत्यंत महत्त्व आहे. मात्र, सोन्याच्या दागिन्यांना केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मागणी आहे. भारतात जून महिन्यापर्यंत लग्नाचा हंगाम असतो. या काळात प्रचंड सोने खरेदी केली जाते त्यामुळे या महिन्यांमध्ये सोन्याची मागणी 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकते अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

जगभरात मंदी असते तेव्हा सोन्या-चांदीचे भाव वाढतात. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. त्यामुळे लोक सोन्यात गुंतवणूक करतात.अर्थव्यवस्थेत तेजी आली की सोन्याचे भाव घसरतात. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT