Why are gold prices high Sakal
Personal Finance

Gold Rate: सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक; चांदीचा भावही वाढला, 'या' 3 कारणांमुळे वाढतेय चकाकी

Gold Rate Today: आज 18 जुलै रोजी सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. ट्रेडिंग दरम्यान, सोन्याचा भाव प्रति औंस 2462.50 डॉलर पर्यंत वाढला, जो त्याचा नवीन विक्रम आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, अमेरिकन सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 0.3% वाढून 2462.50 डॉलरवर पोहोचली.

राहुल शेळके

Gold Rate Today: आज 18 जुलै रोजी सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. ट्रेडिंग दरम्यान, सोन्याचा भाव प्रति औंस 2462.50 डॉलर पर्यंत वाढला, जो त्याचा नवीन विक्रम आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, अमेरिकन सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 0.3% वाढून 2462.50 डॉलरवर पोहोचली.

भारतातही 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,364 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. तर आज आज चांदीच्या भावातही मोठी वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव 96,100 रुपये आहे. सोन्याच्या किमती वाढण्यामागे प्रामुख्याने 3 कारणे आहेत.

1. यूएस व्याजदर कपातीची अपेक्षा

सोन्याच्या किमती वाढण्यामागील प्रमुख कारण म्हणजे व्याजदर कपातीची अपेक्षा. यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची अलीकडील विधाने सप्टेंबरमध्ये व्याजदर कपातीचे संकेत देत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांची सोन्याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

केसीएम ट्रेडचे मुख्य बाजार विश्लेषक टिम वॉटरर यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, गुंतवणूकदार कमी व्याजदर होण्याची अपेक्षा करत आहेत, ज्यामुळे सोन्याची किंमत सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.

आता त्याचे पुढील लक्ष्य 2,500 डॉलर आहे. जर सध्याची परिस्थिती तशीच राहिली तर वर्षाच्या अखेरीस सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात. फेडरल रिझर्व्ह सप्टेंबरच्या बैठकीत किमान 0.25 टक्क्यांनी व्याजदर कपात करेल अशी बाजाराची अपेक्षा आहे.

2. गुंतवणूकदारांची भावना आणि बाजाराची परिस्थिती

सोन्याच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीमध्ये गुंतवणूकदारांची भावना महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मॅट सिम्पसन, सिटी इंडेक्सचे वरिष्ठ विश्लेषक म्हणाले, सोन्याच्या किमती कमी झाल्यास, त्याला 2,450 डॉलरवर चांगला सपोर्ट मिळू शकेल.

सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली तरी गुंतवणूकदार अधिक सोने खरेदी करण्यास तयार असल्याचे या विधानावरून दिसून येते.

3. भू-राजकीय तणाव आणि चीनची वाढती मागणी

भू-राजकीय तणाव आणि सोन्याचा जगातील सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनकडून मोठी मागणी यामुळेही किंमती वाढल्या आहेत. मे आणि जूनमध्ये अधिकृत सोन्याची खरेदी थांबवूनही चीनमध्ये सोन्याला मोठी मागणी आहे.

तज्ज्ञांच्या मते, चीनच्या साठ्यात सोन्याचे प्रमाण अजूनही कमी आहे आणि सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय; शेअर्स तारण ठेवून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेता येणार

Deepak Borhade: दीपक बोऱ्हाडेंचे उपोषण तूर्त स्थगित; धनगर आरक्षणाचा लढा, शासनासोबत चर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT