Gold Price Today Sakal
Personal Finance

Gold Price Today: सोन्याच्या भावात घसरण सुरूच; सोने किती रुपयांनी झाले स्वस्त?

Gold Silver Price Today: आज सोमवारी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सोन्याचे भाव सातत्याने घसरत आहेत. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 72,580 रुपये आहे. 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव गेल्या शुक्रवारच्या तुलनेत 1000 रुपयांनी घसरला आहे.

राहुल शेळके

Gold Silver Price Today: आज सोमवारी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सोन्याचे भाव सातत्याने घसरत आहेत. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 72,580 रुपये आहे. 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव गेल्या शुक्रवारच्या तुलनेत 1000 रुपयांनी घसरला आहे. चांदीचा भाव 91,400 रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे किरकोळ भाव काय आहेत ते जाणून घेऊया.

दिल्लीत आज सोन्याचा भाव

27 मे 2024 रोजी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची भाव अंदाजे 66,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 72,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबईत आज सोन्याचा भाव

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची भाव 66,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची भाव 72,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबादमध्ये आज सोन्याचा भाव

अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची भाव 66,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिलेले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्यापासून दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

मिस्ड कॉलवरून किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, सतत अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

हॉलमार्ककडे लक्ष द्या

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियमांनुसार चालते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT