Gold Silver Rate Sakal
Personal Finance

Gold Silver Rate: सोने खरेदीदारांना मोठा दिलासा; सोने 120 रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाल्यामुळे 10 ग्रॅमचा भाव रु.58,090 च्या जवळ व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाल्यामुळे 10 ग्रॅमचा भाव रु.58,090 च्या जवळ व्यवहार करत आहे. आज सोन्याचे भाव 120 रुपयांनी घसरले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. कोमॅक्सवर सोन्याची किंमत प्रति औंस डॉलर 1926 वर व्यापार करत आहे. तर चांदीच्या भावात किंचित वाढ नोंदवली जात आहे.

सोने आणि चांदीचे भाव

कमोडिटी मार्केट तज्ज्ञ आणि आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले की, सोन्याच्या भावात आणखी घसरण दिसून येईल.

गुडरिटर्न्सच्या साइटनुसार देशांतर्गत सराफा बाजारात प्रति ग्रॅम सोन्याचा भाव 120 रुपयांनी घसरला आहे. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 54,050 तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी आज 58,960 रुपये खर्च करावे लागतील याशिवाय 1 किलो चांदीची किंमत 71,900 रुपये आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी :

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.

24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT