Gold Silver Price Fall Today Latest Update 23 October 2023  Sakal
Personal Finance

Gold Rate Today: नवमीच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण, काय आहे आजचा भाव?

Gold Rate Today in India: नवरात्रीमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.

राहुल शेळके

Gold Silver Price Today Latest Update 23 October 2023:

देशातील ज्वेलरी मार्केटमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅमच्या भावात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 100 ते 350 रुपयांनी स्वस्त झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याचा भाव 61,400 रुपयांच्या वर आहे.

22 कॅरेट सोन्याचा भाव 56,300 रुपयांच्या वर आहे. नवरात्रीच्या काळात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, नवमीच्या दिवशी भाव कमी झाल्यामुळे सोने खरेदीदारांना थोडा दिलासा मिळणार आहे. चांदीचा भाव 75,100 रुपये आहे. त्यातही 200 रुपयांची घसरण झाली आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • हैदराबाद - 61,600 रुपये

  • कोलकत्ता - 61,450 रुपये

  • गुरुग्राम - 61,600 रुपये

  • मुंबई - 61,450 रुपये

  • पुणे - 61,450 रुपये

  • पटना - 61,500 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी :

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

तोंड झाकलं की थेट रेड कार्ड! FIFA World Cup पूर्वी हे नवे नियम होणार लागू; खेळाडूंच्या टाईमपासला बसणार लगाम

Latest Marathi News Live Update : महागाईविरोधात भंडाऱ्यात शिवसेना (उबाठा)चा एल्गार; इंधन व गॅस दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन

पहिला चित्रपट सुपरहिट मग लागली फ्लॉपची लाइन; एका रात्रीत स्टार झालेली गावाकडची साध्या घरातली मुलगी; तुम्ही ओळखलंत का?

"आपण का भीक मागायची त्यांच्याकडे?" सुकन्या मोने यांनी उघड केलं हिंदी मालिका सोडण्याचं खरं कारण, म्हणाल्या..

SCROLL FOR NEXT