Gold-Silver Rate Sakal
Personal Finance

Gold-Silver Rate: सणासुदीच्या काळात इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धामुळे सोने महागणार, काय आहे कारण?

Gold-Silver Rate: इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष वाढत आहे

राहुल शेळके

Gold-Silver Rate: इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष वाढत आहे, दोन्ही बाजूंनी बॉम्बफेक सुरूच आहे. या संघर्षाने आणखी एका संकटाला जन्म दिला आहे. या युद्धामुळे सोन्याच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सोने केवळ दागिने म्हणून नाही तर गुंतवणूक म्हणूनही खूप महत्त्वाचे आहे. कोणतेही संकट आल्यास गुंतवणुकीचे सुरक्षित ठिकाण म्हणून सोन्याकडे पाहिले जाते आणि सध्याच्या संकटानंतरही त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

बाजारात सोन्याची मागणी झपाट्याने वाढली आहे, त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर युद्धामुळे शेअर बाजारात घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, भौगोलिक-राजकीय तणाव वाढल्यामुळे सोने, चांदी आणि डॉलरमध्ये वाढ होऊ शकते.

युद्ध आणि आर्थिक संकटामुळे मागणी वाढली

जगभरात युद्ध आणि आर्थिक संकट असताना सोन्याची मागणी वाढते. युद्ध किंवा आर्थिक संकटामुळे गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानतात.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, स्पार्टन कॅपिटल सिक्युरिटीजचे मुख्य बाजार अर्थशास्त्रज्ञ पीटर कार्डिलो म्हणतात की, आंतरराष्ट्रीय गोंधळाच्या काळात गुंतवणूक पोर्टफोलिओचे संरक्षण करण्यासाठी सोने हा एक चांगला पर्याय आहे. सोन्याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर देखील मजबूत होतो.

सोन्या-चांदीचे भाव वाढू शकतात

भारतात सणासुदीचा हंगाम सुरू असताना इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू झाले आहे. दोन्ही देशांमधील युद्धानंतर सोन्या-चांदीची मागणी झपाट्याने वाढत आहे. सणासुदीच्या काळात भारतात सोन्या-चांदीची मागणी वाढू शकते, त्यामुळे किंमतीत मोठी वाढ होऊ शकते. म्हणजेच सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणे तुम्हाला महागात पडू शकते.

IBJA वेबसाइटनुसार, सराफा बाजारात गेल्या ट्रेडिंग आठवड्यात, 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,539 रुपये, 22 कॅरेटचा भाव 51,790 रुपये आणि 18 कॅरेटचा भाव 42,404 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदीचा दर 67,095 रुपये प्रति किलो होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT