Gold Silver Price Today Dussehra Latest Update 24 October 2023  Sakal
Personal Finance

Gold Rate Today: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

Gold Rate Today in India: सोने-चांदी खरेदी करायची असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

राहुल शेळके

Gold Silver Price Today Latest Update 24 October 2023:

आज दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. bankbazaar.com नुसार, आज म्हणजेच मंगळवार, 24 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,580 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • हैदराबाद - 59,540 रुपये

  • कोलकत्ता - 61,110 रुपये

  • दिल्ली - 60,480 रुपये

  • मुंबई - 60,460 रुपये

  • पुणे - 60,460 रुपये

  • पटना - 61,110 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी :

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Price Today: कच्चे तेल 10% ने घसरले! पेट्रोल-डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

India’s Test squad for Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे पुनरागमन, उप कर्णधार बदलला...

Latest Live Updates Marathi : विरार-भरूच मेमू ट्रेन रुळावरून घसरली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Ratnagiri Leopard Deaths : कोकणात बिबट्यांची डरकाळी धोक्यात? 11 वर्षांत 90 बिबट्यांनी गमावला जीव; वन विभागाकडून रेस्क्यूचे प्रयत्न सुरू

पोट चाकूने कापेन! धमकावत ६५ वर्षीय वृद्धाचा सख्ख्या बहिणींवर अत्याचार, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT