Gold Silver Price on Gudi Padwa sakal
Personal Finance

Gold Silver Price : गुढी पाडव्याच्या दिवशी सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आज ऐन गुढी पाडवाच्या दिवशी सोने चांदीचे दर महागल्याचे दिसतेय.

सकाळ डिजिटल टीम

Gold Silver Price : गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत होता. मंगळवारी गुढी पाडवाच्या आदल्या दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती मात्र आज ऐन गुढी पाडवाच्या दिवशी सोने चांदीचे दर महागल्याचे दिसतेय.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,000 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,000 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 721 रूपये आहे. (Gold silver price update 22 March 2023 Gudi padwa special)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 60,770 रुपये

दिल्ली - 60,150 रुपये

हैदराबाद - 60,000 रुपये

कोलकत्ता - 60,000 रुपये

लखनऊ - 60,150 रुपये

मुंबई - 60,000 रुपये

पूणे - 60,000 रुपये

नागपूर - 60,000 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET SCAM : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट ! सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचे कॉलेजकडून निलंबन

ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Kerala CM VD Satheesan : कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन? 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक...

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटीचं प्रकरण तापलं, पुण्यात NSUI कडून आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

SCROLL FOR NEXT