Gold Silver Price
Gold Silver Price sakal
Personal Finance

Gold Silver Price : गुढी पाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी सोनं चक्क 800 रुपयांनी स्वस्त! पहा तुमच्या शहरातील दर

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. बुधवारी गुढी पाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती मात्र आज गुढी पाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी सोने 800 रुपयांनी स्वस्त झालंय.

गुढी पाडव्याला सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. या अनुषंगाने बुधवारी सोन्याच्या दरात तेजी होती. 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,000 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,000 रुपये होती तर आज 10 ग्रॅम चांदी 721 रूपये होते पण आज सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. (Gold silver price update 23 March 2023 Gudi padwa)

सोने 800 रुपयांनी घसरले आहेत तर चांदीच्या दरातही 5 रुपये कमी झाले आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,200 रुपये तर 24 कॅरेट साठी 69,130 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 716 रूपये आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 59,670 रुपये

दिल्ली - 59,280 रुपये

हैदराबाद - 59,130 रुपये

कोलकत्ता - 59130 रुपये

लखनऊ - 59,280 रुपये

मुंबई - 59,130 रुपये

पूणे - 59,130 रुपये

नागपूर - 59,130 रुपये

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT