Gold-Silver price sakal
Personal Finance

Gold Silver Rate: लग्नसराईत सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ; जाणून घ्या आजचा भाव

सोन्या चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

राहुल शेळके

Gold Silver Rate: तुम्हालाही सोन्या चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोने 60,520 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 71,000 रुपये प्रति किलोच्या खाली विकली जात आहे.

या व्यापार आठवड्यात मंगळवारी सोने प्रति 10 ग्रॅम 487 रुपयांनी स्वस्त होऊन 60342 रुपये प्रति किलोवर बंद झाले. त्याआधीच्या व्यवहारात सोमवारी सोन्याचा भाव 554 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागला आणि 60829 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला.

14 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव:

यानंतर 24 कॅरेट सोने 60,275 रुपये, 23 कॅरेट 60,034 रुपये, 22 कॅरेट 55,212 रुपये, 18 कॅरेट 45,206 रुपये आणि 14 कॅरेटचे दर 35,261 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीचे दर करमुक्त आहेत, त्यामुळे देशातील बाजारातील दरांमध्ये तफावत आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी :

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

नवा नियम:

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.

मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: खून, बलात्कार अन् अनेक गंभीर गुन्हे; दिल्ली आंदोलनात अडीच हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारांचा सहभाग; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Farm Loan Waiver: कर्जमाफीतील तांत्रिक अडथळे दूर करा; पात्र शेतकरी वंचित राहू नयेत, शिवसेनेची मागणी

Latest Marathi News Live Update : बारवी धरण ९१ टक्के भरलं; दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सोनाली कुलकर्णीच्या भावाची लगीनघाई! भावजयीवर भारी पडली नणंद; बायकोला पाहून कुणाल जीजू म्हणतात-

Pune Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव पिकअपची धडक, सहा मेंढ्या ठार

SCROLL FOR NEXT