gold investment Sakal
Personal Finance

Gold Investment: सोने 6,700 रुपयांनी स्वस्त; खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? काय सांगतात तज्ज्ञ

Gold Silver Prices Drop: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का? कारण आतापर्यंतच्या उच्चांकावरून सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 6700 रुपयांनी स्वस्त झाले आहे

राहुल शेळके

Gold Silver Prices Drop: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का? कारण आतापर्यंतच्या उच्चांकावरून सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 6700 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर चांदीची किंमत 13,000 रुपये प्रति किलोने कमी झाली आहे.

तज्ञांच्या मते, जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते थोडे-थोडे करून खरेदी करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सोन्यात एक लाख रुपये गुंतवायचे असतील तर तुम्ही आता 40 हजार रुपये किमतीचे सोने खरेदी करू शकता, उर्वरित 60 हजार रुपये ठेवा, कारण सोन्याचे भाव आणखी घसरले तर उरलेल्या पैशाने आणखी खरेदी करा.

सोने आणि चांदीची किंमत

शुक्रवारी संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 68131 रुपये होता, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 62408 रुपये होता. तर चांदी सध्या 81271 रुपये प्रतिकिलो आहे.

गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सोन्याच्या भावात घट झाली आहे, गुरुवारी संध्याकाळी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 68,227 रुपये होता, जो आज 68,131 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी चांदीचा भाव 81,474 रुपये प्रति किलो होता, तो शुक्रवारी 81,271 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला.

सोन्याने दिला जबरदस्त परतावा

सोन्याने मोठा परतावा दिला आहे. इंडियन पोस्ट गोल्ड कॉइन सर्व्हिसेसच्या मते, देश स्वतंत्र झाला तेव्हा प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 88 रुपये 62 पैसे होती. त्याची किंमत 1964 मध्ये पहिल्यांदा घसरली आणि ती 63.25 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आली.

1970 आणि 80 च्या दशकात त्याची किंमत 1184 ते 1130 रुपये इतकी होती. 1990 मध्ये सोन्याच्या भावाने मोठी झेप घेतली आणि 3,200 रुपयांपर्यंत पोहोचले. त्यानंतर पाच वर्षांनी 1995 मध्ये सोने 4,680 रुपये झाले.

सोन्याला संकटात आधार मानले जाते, जेव्हा जेव्हा जगातील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे तेव्हा गुंतवणूकदारांचा सोन्यावरील विश्वास वाढला आहे. उदाहरणार्थ, कोरोना संकटाच्या काळात शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांची निराशा केली. बँकांचे व्याजदर सातत्याने कमी होत आहेत. पण त्या काळात सोन्याने लोकांना चांगला परतावा दिला होता.

नोंद - सोने-चांदी, क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT