silver sakal
Personal Finance

चांदीची चमक फायद्याचे गमक

गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंचे भाव उच्चांकी पातळीवर गेले आहेत.

अमित मोडक

गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंचे भाव उच्चांकी पातळीवर गेले आहेत. सोन्याच्या भावाने, तर काही दिवसांपूर्वी सार्वकालिक उच्चांक गाठला होता. चांदीही यात काही मागे नाही. चांदीनेही प्रति किलो ९६ हजार रुपयांचा स्तर गाठून सोन्यापेक्षा आपणही काही कमी नाही, हे दाखवून दिले. आपल्या देशात सोन्याप्रमाणेच चांदीलाही महत्त्व आहे.

दागिने, देवपूजेसाठीची भांडी, शोभेच्या वस्तू, घरगुती वापरासाठीची भांडी याकरिता चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. चांदीचे औषधी महत्त्वही असल्याने पूर्वापार चांदीची भांडी वापरण्याचा प्रघात आहे. त्यामुळे चांदीही आवर्जून खरेदी केली जाते. याशिवाय चांदीचा वापर औद्योगिक कारणाकरिता केला जात असल्यानेही चांदीला मोठी मागणी असते. गुंतवणुकीसाठीही आता चांदीचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे.

चांदीची किंमत सोन्याच्या काही पटीत असते. सोने हे चांदीच्या ऐंशी ते नव्वद पट महाग असते. एक किलो चांदीला जेवढी किंमत लागते ती त्याच्या ऐंशी ते नव्वदपट किंमत सोन्याची असते. सध्याचा चांदीचा किंवा सोन्याचा भाव पाहिला, तर सोन्याची किंमत चांदीच्या ७५ पट आहे. याचा अर्थ पुढील काळात सोने महाग झाले पाहिजे किंवा चांदी स्वस्त होणे अपेक्षित आहे. सोने महागण्याचा जो वेग आहे, तो आता टिकून राहील, असे वाटत नाही.

मागणीत वाढ

इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही), सौरऊर्जा उपकरणे, फाइव्ह-जी तंत्रज्ञान, मोबाइल कनेक्टर यासाठी चांदीचा वापर केला जातो. या सर्व गोष्टींची मागणी सध्या वेगाने वाढत आहे, परिणामी चांदीची मागणीही वाढत आहे. त्यात तुलनेत पुरवठा मात्र कमी आहे. गेल्या दहा वर्षांत चांदीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत आहे. वर्ष २०२३ मध्ये ही तफावत अधिक वाढली आहे.

चांदीची किंमत वाढत आहे, तशी चांदीच्या ‘ईटीएफ’मध्येही गुंतवणूक वाढत आहे. गेल्या वर्षी ‘ईटीएफ’मध्ये ७७०० टन चांदी खरेदी केली गेली. हे प्रमाण औद्योगिक वापराकरिता मागणी असलेल्या चांदीच्या निम्मे आहे. बँकर किंवा ‘ईटीएफ’ मॅनेजरना गुंतवणूकदारांच्या पैशातून चांदी खरेदी करून ती कस्टडीमध्ये ठेवावी लागते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चांदी बाजारातून बाहेर जाते. परिणामी चांदीची मागणी व पुरवठा यातील तफावत वाढत आहे.

त्यामुळे चांदीचा पुरवठा कमी होत आहे. चांदीच्या खाणींमध्ये संप झाल्याने यामुळे उत्पादन घटले, मागणी आणि पुरवठ्यात ५० लाख किलोची तफावत वाढली. जुनी चांदी बाजारात येण्याचे प्रमाण २०१६ पासून कमी झाले आहे, त्याचाही परिणाम पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे भाववाढही होत आहे. आतापर्यंतचा सार्वकालिक उच्चांक २०१३ मध्ये २०४२ डॉलर आणि त्यानंतर २०५० डॉलर आहे.

हा उच्चांक पुन्हा गाठायचा असेल, तर ३३ ते ४५ टक्के वाढ होणे आवश्यक आहे. चांदीचा नवा उच्चांक अद्याप यायचा आहे. चांदीच्या ‘ईटीएफ’मधील गुंतवणूक वाढली, तर चांदीचा पुरवठा कमी होईल. औद्योगिक चांदीचा पुरवठा कमी झाला, तर भाव आणखी वाढतील. चीनमध्येही औद्योगिक क्षेत्रात चांदीचा वापर वाढत आहे, त्याचाही परिणाम भाव वाढण्यावर होत आहे.

गुंतवणुकीची उत्तम संधी

मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे चांदीचे भाव सध्याच्या भावपातळीवरून आणखी ४० टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांदीत गुंतवणूक करण्यासाठी सध्या चांगली संधी आहे. ‘ईटीएफ’ आणि प्रत्यक्ष चांदी खरेदी असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. अनेकदा चांदीचे भाव वाढतात, त्याप्रमाणात ‘ईटीएफ’ युनिटचे भाव वाढत नसल्याचे आढळून येते. त्या तुलनेत चांदी प्रत्यक्ष खरेदी करून योग्य वेळी विकण्याचा पर्याय लाभदायी आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या ओळखीच्या सराफांकडून चांदी घेऊन ती योग्य वेळी विक्री केल्यास चांगला फायदा मिळवता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

SCROLL FOR NEXT