Gold Silver rate today karwachauth 2023 Latest Update 30 October 2023  Sakal
Personal Finance

Gold Rate Today: करवा चौथच्या आधी सोने महागले, दागिने घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचा भाव?

Gold Rate Today in India: सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.

राहुल शेळके

Gold Silver Price Today Latest Update 30 October 2023:

करवा चौथच्या आधी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव मुंबईत 62,630 रुपये आणि दिल्लीत 62,960 रुपयांवर पोहोचला आहे. जर तुम्ही या करवा चौथला तुमच्या पत्नीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यावेळी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील.

करवा चौथच्या आधी सोने महागले

आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी सोन्याचे भाव वाढले आहेत. करवा चौथ बुधवारी 1 नोव्हेंबर रोजी आहे. गेल्या आठवड्याच्या शुक्रवारच्या तुलनेत सोन्याचा भाव 800 ते 1200 रुपयांनी वाढला आहे. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने सोन्याच्या भावात वाढ झाली. देशातील अनेक शहरांमध्ये सोन्याचा भाव 60,000 रुपयांच्या आसपास आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई- 62,960 रुपये

  • कोलकत्ता - 62,630 रुपये

  • दिल्ली - 62,960 रुपये

  • मुंबई - 62,630 रुपये

  • पुणे - 62,630 रुपये

  • पटना - 62,680 रुपये

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT