Bnak
Bnak  Sakal
Personal Finance

Five Day Working: बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आठवड्यातून फक्त 5 दिवस काम? पूर्ण करावी लागेल 'ही' अट

राहुल शेळके

Bank Five Days Working: बँक कर्मचाऱ्यांना लवकरच आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करण्याची परवानगी मिळू शकते. एका अहवालानुसार, युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज आणि इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) यांनी दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्यावर चर्चा चालु आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अधिसूचना जारी झाल्यास हे कर्मचारी सोमवार ते शुक्रवारपर्यंत काम करू शकतात. असोसिएशने आठवड्यातून पाच दिवस काम करण्याचे मान्य केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

दर शनिवारी सुट्टी जाहीर करावी लागणार:

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस एस. नागराजन म्हणाले की, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम 25 नुसार शनिवारची सुट्टी सरकारला प्रत्येक वेळी जाहीर करावी लागेल.

हा करार अल्प कालावधीसाठी असून तो पगाराच्या अधीन नसल्याचे त्यांनी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे की सरकारनेही याला सहमती दर्शवली आणि आरबीआयने देखील ही योजना स्वीकारली पाहिजे असे म्हटले आहे.

कामाचे तास वाढतील:

याची अंमलबजावणी झाल्यानंतर कर्मचारी दररोज सकाळी 9.45 ते सायंकाळी 5:30 या वेळेत 40 मिनिटे जास्त काम करतील. सध्या महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.

अशा स्थितीत ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बँक युनियन अनेक दिवसांपासून पाच दिवसांच्या कामाची मागणी करत आहेत.

काम डिजिटल पद्धतीने केले जाणार:

बँक ग्राहक सुट्टीच्या काळात अनेक कामे ऑनलाइन करू शकतात. याव्यतिरिक्त, मोबाइल बँकिंग, एटीएम आणि इतर कार्ये पूर्ण करू शकतात. मात्र, बँकेच्या शाखेशी संलग्न केलेले पासबुक छापणे, कर्ज घेणे किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करू शकणार नाही.

हा प्रस्ताव कधीपासून लागू होणार आहे:

CNBC Awaz ने दिलेल्या वृत्तानुसार, वित्त मंत्रालय लवकरच याला मंजुरी देऊ शकते. इंडियन असोसिएशन आणि युनायटेड फोरम बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या कराराला सहमती दर्शवल्याचे मंत्रालयाने म्हटले होते. मात्र, कर्मचाऱ्यांचा कामाचा कालावधी 40 मिनिटांनी वाढणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : युतीची सत्ता येताच उद्धवजींना मुख्यमंत्रिपदाचे वेध

आगळी दक्षिणकोंडी

‘लाट’विरहित निवडणुकीचा अन्वयार्थ...

मेंदूवर आदळणाऱ्या डिजिटल-प्रचारातून सुटलेलं काही...

एक दूसरे से करते है प्यार हम...

SCROLL FOR NEXT