Modi government Diwali Bonus Sakal
Personal Finance

Diwali Bonus: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार आणखी गोड, मोदी सरकारने जाहीर केला बोनस

Modi government Diwali Bonus: सरकारकडून आज आणखी एक मोठी घोषणा केली जाऊ शकते.

राहुल शेळके

Modi government Diwali Bonus: मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी नॉन-प्रॉडक्‍टिव्हिटी लिंक्ड बोनस (Adhoc Bonus) मंजूर केला आहे. दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून ही मोठी भेट मिळाली आहे. मंत्रालयाने मंगळवारी (17 ऑक्टोबर) सांगितले की 2022-23 साठी केंद्र सरकारच्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी 7,000 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे.

'या' कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस

केंद्र सरकारच्या अंतर्गत गट ब आणि क गटात येणाऱ्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. याशिवाय केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांनाही बोनसचा लाभ दिला जातो.

एकीकडे दिवाळीपूर्वी मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे, तर दुसरीकडे सरकारकडून आज बुधवारी आणखी एक मोठी घोषणा केली जाऊ शकते. कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यामध्ये (DA Hike) वाढ करण्याबाबत सरकार मोठी घोषणा करू शकते. यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

डीएमध्ये 4 टक्के वाढ अपेक्षित आहे

केंद्रीय मंत्रिमंडळ आणि CCEA यांची आज बैठक होणार असून त्यात डीए वाढीबाबत निर्णय होऊ शकतो. मोदी सरकारने अपेक्षेप्रमाणे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली, तर त्यांना आत्तापर्यंत मिळणारा डीए 42 टक्क्यांवरून 46 टक्के होईल आणि त्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. मात्र, अद्यापपर्यंत डीए वाढीबाबत सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT