Google Layoffs Sakal
Personal Finance

Google Layoffs: गुगलचा मोठा निर्णय! 'या' विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना दिला नारळ, काय आहे कारण?

Google Layoffs: गुगल कंपनी त्यांच्या डिजिटल, हार्डवेअर आणि अभियांत्रिकी विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. कंपनीने सांगितले आहे की, खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. याचा सर्वात मोठा परिणाम हार्डवेअर टीमवर होत आहे.

राहुल शेळके

Google Layoffs: गुगल कंपनी त्यांच्या डिजिटल, हार्डवेअर आणि इंजिनिअरिंग विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. कंपनीने सांगितले आहे की, खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Fitbit कंपनीचे सह-संस्थापक जेम्स पार्क, एरिक फ्रिडमन आणि इतर Fitbit कंपनीतील अधिकारी कंपनी सोडत आहेत. Google ने 2019 मध्ये Fitbit ही कंपनी 2.1 बिलियन डॉलरमध्ये विकत घेतली होती.

Google प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले की , "डीएसपीए (डिव्हाइसेस आणि सर्व्हिसेस) मधून शंभर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा सर्वात मोठा परिणाम हार्डवेअर टीमवर होत आहे.

गेल्या वर्षी सुमारे 12,000 लोकांना कामावरून काढून टाकल्यानंतर गुगलने नवीन कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, Google आपल्या डिजिटल असिस्टंट, हार्डवेअर आणि इंजिनिअरिंग टीममधील शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. खर्च कमी करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कंपनी हा निर्णय घेत आहे.

Amazon 500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार

जेफ बेझोस यांची कंपनी Amazonने गेल्या वर्षी मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते. कंपनीने प्राइम व्हिडिओ आणि MGM स्टुडिओ विभागांमधील कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. या अंतर्गत कंपनी शेकडो कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने अंदाज वर्तवण्यात आला आहे की सुमारे 500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. अॅमेझॉनने 2022 मध्ये सर्वात मोठी कर्मचारी कपात केली होती, ज्यामध्ये जगभरातील सुमारे 27,000 कर्मचारी प्रभावित झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT