Google Layoff Sakal
Personal Finance

Google Layoff: AI मुळे नोकऱ्या जाणार! गुगल 30,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार का?

Google Layoff: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे सुमारे 30,000 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे. कारण Google AI मॉडेलवर लक्ष केंद्रित करत आहे. द इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार, गुगल लवकरच 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते.

राहुल शेळके

Google Layoff: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे सुमारे 30,000 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे. कारण Google AI मॉडेलवर लक्ष केंद्रित करत आहे. द इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार, गुगल लवकरच 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकते.

काय आहे गुगलचा प्लॅन?

द इन्फॉर्मेशनच्या अहवालानुसार, गुगल कंपनी आपले कर्मचारी मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते. सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. याचा प्रामुख्याने Google च्या जाहिरात विक्री विभागावर परिणाम होण्याची अपेक्षा आहे, जिथे कंपनी ऑपरेशनल कामासाठी AI चा वापर करु शकते.

वर्षभरापूर्वी 12 हजार कर्मचाऱ्यांना दिला होता नारळ

या बदलांबद्दल बोलताना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी व्यवसायाची पुनर्रचना करणार असल्याचे मान्य केले आहे. कंपनीने आतापर्यंत सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. हा निर्णय वर्षभरापूर्वी म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये घेण्यात आला होता. कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात होती.

त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे

जानेवारीच्या सुरुवातीला, पिचाई यांनी एका बैठकीत सांगितले होते की, कर्मचाऱ्यांची संख्या 6 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी कंपनीचे संस्थापक आणि संचालक मंडळाशी चर्चा केली होती.

तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांमधील कपातीचा आढावा घेणाऱ्या वेबसाइटच्या ताज्या आकडेवारीनुसार, या वर्षी जागतिक स्तरावर (26 डिसेंबरपर्यंत) 1,178 तंत्रज्ञान कंपन्यांनी 2,60,771 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT