Google Wallet comes to India on Android phones All the details  Sakal
Personal Finance

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे? करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच झाले आहे. गुगल इंडियाने आज या डिजिटल वॉलेटचे अनावरण केले आहे. Google ची ही वॉलेट सेवा Google Pay पेक्षा पूर्णपणे वेगळी असेल, ज्यामध्ये युजर त्यांचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, गिफ्ट कार्ड इत्यादी डिजिटल स्वरूपात ठेवू शकतील.

राहुल शेळके

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच झाले आहे. गुगल इंडियाने आज या डिजिटल वॉलेटचे अनावरण केले आहे. Google ची ही वॉलेट सेवा Google Pay पेक्षा पूर्णपणे वेगळी असेल, ज्यामध्ये युजर त्यांचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, गिफ्ट कार्ड इत्यादी डिजिटल स्वरूपात ठेवू शकतील.

गुगलने भारतात फक्त अँड्रॉइड युजर्ससाठी आपले वॉलेट लाँच केले आहे. या खाजगी डिजिटल वॉलेटमध्ये युजर त्यांचे कार्ड, तिकिटे, पास आणि आयडी ठेवू शकतील. गुगलचे हे वॉलेट डिजिलॉकरसारखे असेल, ज्यामध्ये युजर आर्थिक डेटा डिजिटल स्वरूपात ठेवू शकतील.

गुगल वॉलेटचे काय आहेत फायदे?

  • चित्रपट आणि कार्यक्रमाची तिकिटे Google Wallet मध्ये सेव्ह केली जाऊ शकतात. यामध्ये PVR आणि INOX चा समावेश आहे. युजर्सना या फीचरचा खूप फायदा होणार आहे. तुम्ही अनेकदा प्रवास करत असाल तर गुगल वॉलेट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. या ॲपमध्ये तुम्हाला अनेक बोर्डिंग पासचा अॅक्सेस मिळेल.

  • यामध्ये एअर इंडिया, मेक माय ट्रिप, इझी माय ट्रिप, इक्सीगो इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये गुगल पिक्सेल यूजर्सला अधिक फायदे मिळतील.

  • युजर Google Wallet मध्ये लॉयल्टी आणि गिफ्ट कार्डचे फायदे देखील घेऊ शकतील. यामध्ये फ्लिपकार्ट आणि डॉमिनोजसारख्या नावांचा समावेश आहे. गुगल वॉलेट ॲपमुळे सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करणे अधिक सोपे होईल. या ॲपद्वारे, तुम्ही कोची मेट्रो, हैदराबाद मेट्रो, अभी बस इत्यादी ठिकाणांची तिकिटे सहज खरेदी करू शकता आणि ती सेव्ह करु शकता.

  • Google Wallet द्वारे, युजर त्यांचे दस्तऐवज सहजपणे डिजिटल स्वरूपात ठेवू शकतात. यामध्ये बोर्डिंग पास, लगेज टॅग, पार्किंग पावत्या, बारकोड आणि QR कोड इत्यादींचा समावेश आहे.

  • Google Wallet द्वारे ट्रेनची तिकिटे आणि इव्हेंटची माहिती ईमेलद्वारे देखील पाठविली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : सासऱ्यांनी सुरू केलेल्या डिबेंचरविरोधात सुनेचा मोर्चा, ढोंगी माणसांना लोक ओळखून, हसन मुश्रीफांचा कोणावर रोख...

Minister Dattatreya Bharane: राज्यात रब्बी हंगाम क्षेत्रात होणार वाढ: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे; पाणी टंचाई जाणवणार नाही

Hingoli Diwali : फटाके उडवताना पाच वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला दुखापत; फुटलेला फटाका उडून डोळ्यातील बुब्बूळाला लागला अन्...

Khambatki Ghat Traffic : ऐन दिवाळीत खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; वाहनचालक हैराण, सातारा-पुणे महामार्गावर लांबलचक रांगा

VIDEO : गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग, अनेक प्रवासी जखमी; सकाळी ७ वाजता घडली दुर्घटना

SCROLL FOR NEXT