Hotel Company Sakal
Personal Finance

अर्थभान : हॉटेल कंपन्यांची भरभराट

भारतातल्या मुख्य आठ शहरांतून विश्वकप स्पर्धेचे क्रिकेट सामने दिवसरात्र खेळले जाणार आहेत. यामुळे तिथल्या हॉटेल व्यवसायाला उभारी येण्याची शक्यता आहे.

गोपाळ गलगली

भारतात पाच ऑक्टोबरपासून सुरू होणारे आणि तब्बल ४५ दिवस चालणारे विश्वकप स्पर्धेचे क्रिकेट सामने धमाल उडवून देणार आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आदी आठ देशांतून क्रिकेट संघ आणि प्रेक्षकांचे जथ्थे भारतात उतरणार आहेत. त्यात या खेळाच्या एतद्देशीय लाखो चाहत्यांची भर पडणार आहे.

भारतातल्या मुख्य आठ शहरांतून हे सामने दिवसरात्र खेळले जाणार आहेत. यामुळे तिथल्या हॉटेल व्यवसायाला उभारी येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात नुकतीच एक बातमी वाचली. त्यानुसार, अहमदाबाद येथील हॉटेलचे दर भारत-पाक सामन्याच्या कालावधीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. सध्या हा दर ६,५०० रुपये ते १० हजार रुपये आहे. यावरून हॉटेल व्यवसायाला किती लाभ होणार आहे, हे लक्षात येईल.

‘ईक्रा’च्या अहवालानुसार हॉटेल व्यवसायाची वाढ दुहेरी अंकात होण्याची शक्यता आहे. ही वाढ १३ ते १५ टक्के असेल. क्रिकेट सामन्यांशिवाय जी-२० बैठका, अमेरिकी कंपन्याशी करार, लग्नसराई अशा अनेक कारणांमुळेही हॉटेल व्यवसायाच्या वाढीला चालना मिळणार आहे.

थोडक्यात, भारताची आर्थिक परिस्थिती वेगाने सुधारत असून, लोकांचे उत्पन्नही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकांची खर्च करण्याची प्रवृत्तीही वाढत आहे. त्याचा लाभ हॉटेल व्यवसायाला होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उत्तम कंपन्यांचे शेअरही चांगला नफा देऊ शकतील. त्याकडे गुंतवणूकदारांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

(लेखक ज्येष्ठ गुंतवणूकतज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT