IRFC Shares Sakal
Personal Finance

IRFC Shares: मोदी सरकार 'या' कंपनीतील हिस्सा विकणार, मिळणार 7,600 कोटी रुपये

IRFC Shares Fall: कंपनीत सरकारची 86.36 टक्के हिस्सेदारी आहे.

राहुल शेळके

IRFC Shares Fall: इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) चे शेअर्स गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात घसरले. कंपनीचे शेअर्स 5.66% पर्यंत घसरून 48.29 रुपये झाले. शेअर्सच्या या घसरणीमागे मोठे कारण म्हणजे सरकार या कंपनीतील आपला हिस्सा विकू शकते. भारतीय रेल्वेच्या या कंपनीत सरकारची 86.36 टक्के हिस्सेदारी आहे.

सरकार चालू आर्थिक वर्षात ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनमधील आपले काही हिस्सेदारी विकण्याचा विचार करत आहे. असे वृत्त इकनॉमिक टाइम्सने दिले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी सेबीची किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग (एमपीएस) आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, सरकारला त्यातील 11.36 टक्के हिस्सा कमी करावा लागेल.

MPS नियमांनुसार, एखाद्या संस्थेला सूचीबद्ध झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत किमान 25 टक्के सार्वजनिक शेअरहोल्डिंगची आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्याच्या बाजारमूल्यानुसार, 11.36 टक्के भागविक्रीतून सरकारला सुमारे 7,600 कोटी रुपये मिळतील.

कंपनीच्या शेअर्सची स्थिती

गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या एका महिन्यात शेअर 52% आणि गेल्या 6 महिन्यांत 71.83% वाढला आहे. या वर्षी 2023 पर्यंत या रेल्वे कंपनीचे शेअर्स 50.15% वर चढले आहेत.

तर, या शेअरने गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या काळात ते 132% पर्यंत वाढले आहे. IRFC शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च किंमत 52.71 रुपये आहे.

तर, त्याची 52 आठवड्यांची सर्वात कमी किंमत 20.55 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 64,532.28 कोटी रुपये आहे. त्याचा IPO 2021 मध्ये 26 रुपयांच्या प्राइस बँडवर आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT