Government rolls out subsidised Bharat Atta at Rs 27.50 per kg ahead of Diwali  Sakal
Personal Finance

Bharat Atta: सरकारची सर्वसामान्यांना दिवाळी भेट! आजपासून देशभरात स्वस्तात मिळणार पीठ, किती आहे किंमत?

Modi Government Bharat Atta Scheme: सरकारकडून दिवाळीला स्वस्तात पीठ विकले जाणार आहे.

राहुल शेळके

Modi Government Bharat Atta Scheme: सध्या देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. त्याचबरोबर महागाईही शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी सरकारकडून दिवाळीला स्वस्तात पीठ विकले जाणार आहे. सरकारने आटा ब्रँड लाँच केला आहे.

दिवाळीपूर्वी ग्राहकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्राने सोमवारी 'भारत आटा' ब्रँड लॉन्च केला आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, गव्हाचे पीठ देशभरात 27.50 रुपये प्रतिकिलो दराने विकले जाईल.

केंद्रीय ग्राहक मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते दिल्लीतील कर्तव्य मार्गावरून भारत आटा लॉन्च करण्यात आला. पीयूष गोयल यांनी दिल्ली एनसीआरसाठी 130 वाहनांना हिरवा झेंडा दाखवला.

पिठाची किंमत सरकारने 27 रुपये 50 पैसे प्रतिकिलो ठरवली आहे. मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या पिठाचा भाव मात्र 40 ते 45 रुपये किलो आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून गव्हाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सरकारने आपल्या राखीव साठ्यातून मोठ्या प्रमाणात गहू बाजारात आणला आहे जेणेकरून त्याचा फायदा थेट ग्राहकांना होईल.

आता मदर डेअरी, नाफेड, एनसीसीएफ यांसारख्या सरकारी विक्रीतून भारत आटा थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. भारत आटा 10 किलो आणि 30 किलोच्या पॅकेटमध्ये उपलब्ध असेल.

याआधी सरकारच्या ग्राहक मंत्रालयाने भारत दाल योजना सुरू केली होती, ज्याअंतर्गत स्वस्त दरात डाळ विकली जात होती. अलीकडेच कांद्याच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राहक मंत्रालयाने देशातील सर्व शहरांमध्ये स्वस्त दरात कांद्याची विक्री सुरू केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT