Service Sector sakal
Personal Finance

Service Sector : सेवाक्षेत्राची वाढ मंदावली

देशांतर्गत मागणी कमकुवत झाल्यामुळे सेवाक्षेत्रातील वाढ मे महिन्यात पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली असल्याचे ‘एचएसबीसी’च्या अहवालात म्हटले आहे. मात्र, सेवाक्षेत्राच्या निर्यातीत वाढ झाल्याचे आणि रोजगारनिर्मिती सुधारल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशांतर्गत मागणी कमकुवत झाल्यामुळे सेवाक्षेत्रातील वाढ मे महिन्यात पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली असल्याचे ‘एचएसबीसी’च्या अहवालात म्हटले आहे. मात्र, सेवाक्षेत्राच्या निर्यातीत वाढ झाल्याचे आणि रोजगारनिर्मिती सुधारल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘एचएसबीसी’ने आज प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, हेडलाइन पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) एप्रिलमधील ६०.८ वरून मे महिन्यात ६०.२ वर घसरला. तीव्र स्पर्धा, किमतीचा दबाव आणि उष्णतेची तीव्र लाट यामुळे सेवा क्षेत्राच्या वाढीचा दर मंदावला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मे महिन्यात भारताच्या सेवा क्षेत्राची वाढ संथ गतीने झाली, देशांतर्गत नव्या ऑर्डर अत्यल्प प्रमाणात कमी झाल्या, पण जगभरातून मागणीमुळे आधार मिळाला, असे ‘एचएसबीसी’च्या अर्थतज्ज्ञ मैत्रेयी दास यांनी सांगितले.

‘सप्टेंबर २०१४ मध्ये सर्वेक्षण सुरू झाल्यापासून मे महिन्यात सर्वांत वेगवान वाढीसह नव्या निर्यात ऑर्डरींमध्ये लक्षणीयरीत्या सुधारणा झाली आहे. सर्वेक्षणातील सहभागींनी आशिया, आफ्रिका, युरोप, पश्चिम आशिया आणि अमेरिका आदी देशांनी मागणीत मजबूत वाढ नोंदवली आहे.

भाजीपाल्यांच्या किमतीसह मांस आणि पॅकेजिंगच्या किंमतीत वाढ झाल्याने मे महिन्यात खर्चाचा दबाव वाढला. किंमतीच्या आघाडीवर, कच्चा माल आणि मजुरीच्या खर्चामुळे मे महिन्यात किमतीच्या दबावात वाढ झाली. कंपन्या केवळ किमतीतील वाढीचा काही भाग ग्राहकांना हस्तांतरित करण्यास सक्षम होत्या. आघाडीच्या सेवा कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढवले ​​आहे,’’ असेही दास यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Putin India Visit: आजचा भारत ७७ वर्षांपूर्वीचा नाही, मोदी-पुतिन भेटीत उघडकीस आले राजकारण अन् तेल करारांचे रहस्य; बाह्य दबाव फेल!

Ahmednagar–Shirdi Highway: 'कोल्हारमध्ये साईड गटाराचा स्लॅब ढासळला'; अहिल्यानगर-शिर्डी महामार्गावरील चार दिवसांपूर्वीच काम..

High Court Live Verdict : "विवाहाचं कायदेशीर वय पूर्ण झालं नाही तरीही...."; 'लीव्ह इन' बाबत उच्च न्यायालयाचा धक्कादायक निर्णय!

Marathi Breaking News LIVE: नाशिक -पुणे महामार्गावर गेल्या एक तासापासून प्रचंड वाहतूक कोंडी

तेजश्री प्रधानचा गौरव! महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठीत सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, म्हणाली...'प्रत्येक दिवस काहीतरी नवीन...'

SCROLL FOR NEXT