Groww App Sakal
Personal Finance

Groww App: गुंतवणूकदारांचा मोठा दावा! म्हणाले, ग्रो ॲपमधून पैसे कापले पण गुंतवणूक झाली नाही, काय आहे प्रकरण?

Groww App: एका युजरने ब्रोकरेज कंपनी Groww वर फसवणुकीचा आरोप केला आहे. गुंतवणूक नसतानाही खात्यातून पैसे कापले गेल्याचे युजरने सांगितले. या संपूर्ण प्रकरणात ग्रोकडून स्पष्टीकरण आले आहे. त्याचबरोबर ग्राहकांचे पैसेही परत करण्यात आले आहेत.

राहुल शेळके

Groww App: एका युजरने ब्रोकरेज कंपनी Groww वर फसवणुकीचा आरोप केला आहे. गुंतवणूक नसतानाही खात्यातून पैसे कापले गेल्याचे युजरने सांगितले. या संपूर्ण प्रकरणात ग्रोकडून स्पष्टीकरण आले आहे. त्याचबरोबर ग्राहकांचे पैसेही परत करण्यात आले आहेत.

हनेंद्र प्रताप सिंह नावाच्या ग्राहकाने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, खात्यातून पैसे कापूनही ग्रो ॲपने कोणत्याही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले नाहीत. ते म्हणाले की ग्रो ॲपने चुकीचा फोलिओ क्रमांक तयार केला जो अस्तित्वात नाही.

हनेंद्र सिंह यांनी दावा केला की, जेव्हा त्यांच्या बहिणीने पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला समजले की कोणतीही गुंतवणूक झालेली नाही. ग्राहकाने स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र नंतर तो हटवण्यात आला. मात्र, तोपर्यंत इतर अनेक युजर्सने तो शेअर केला.

काय आहे प्रकरण?

हनेंद्रने एका लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या बहिणीने 2020 मध्ये ग्रो ॲपद्वारे पराग पारिख म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले होते. त्यानंतर व्यवहार यशस्वी दाखवण्यात आला. आणि फोलिओ क्रमांक देखील तयार केला गेला. मात्र आम्ही पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यांनी सांगितले की, पराग पारीख यांच्याशी बोलल्यानंतर कोणतीही गुंतवणूक झाली नसल्याचे समोर आले. आणि Grow ने दिलेला फोलिओ नंबर अस्तित्वात नाही.

अशाच एका सोशल मीडिया पोस्टला प्रतिसाद देताना, ग्रो म्हणाले की, ग्राहकाच्या डॅशबोर्डमध्ये चुकून फोलिया अपडेट झाला होता. मात्र कोणताही व्यवहार झाला नाही. ग्राहकांच्या खात्यातून एकही पैसा कापण्यात आलेला नाही.

ग्रोच्या या प्रतिक्रियेवर, रोहन दास, ज्यांच्या ट्विटला ग्रोने उत्तर दिले आहे, ते म्हणतात की हनेंद्र खोटे बोलत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि जर ग्रो खोटे बोलत असेल तर सेबीने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. ग्रोच्या या उत्तराला प्रतिसाद म्हणून, इतर काही वापरकर्त्यांनी अशा तक्रारी केल्या आहेत ते देखील रिडीम करू शकत नसल्यामुळे नाराज आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT