GST  sakal
Personal Finance

GST : ‘जीएसटी’ संकलन १.७३ लाख कोटींवर ; वार्षिक १० टक्क्यांनी वाढ

देशाचे एकूण वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) संकलन मे महिन्यात १.७३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाचे एकूण वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) संकलन मे महिन्यात १.७३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. देशांतर्गत व्यवहारातून वाढलेल्या महसुलामुळे आणि आयात कमी झाल्यामुळे त्यात वार्षिक दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे अर्थ मंत्रालयाने आज सांगितले.

एप्रिलमध्ये ‘जीएसटी’ संकलनाने २.१० लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. देशांतर्गत व्यवहारांतून १५.३ टक्क्यांनी वाढ झाली असून, आयात ४.३ टक्क्यांनी खाली आल्याने महसुलात मोठी वाढ झाली आहे, असेही अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

परतावा दिल्यानंतर, मे महिन्यातील निव्वळ ‘जीएसटी’ महसूल १.४४ लाख कोटी रुपये असून, मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात ६.९ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये मे २०२४ पर्यंत एकूण ‘जीएसटी’ संकलन ३.८३ लाख कोटी होते.

वर्षभरात त्यात ११.३ टक्के वाढ झाली असून, देशांतर्गत व्यवहारांमध्ये १४.२ टक्क्यांनी झालेली वाढ आणि आयातीत झालेली किरकोळ १.४ टक्क्यांची वाढ यामुळे ही वाढ झाली आहे. परताव्यानंतर, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मे २०२४ पर्यंत निव्वळ ‘जीएसटी’ महसूल ३.३६ लाख कोटी रुपये आहे, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात ११.६ टक्के वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT