GST collection at Rs 1 73 lakh crore Ten percent growth per annum Sakal
Personal Finance

GST : ‘जीएसटी’ संकलन १.७३ लाख कोटींवर; वार्षिक दहा टक्क्यांनी वाढ

एप्रिलमध्ये ‘जीएसटी’ संकलनाने २.१० लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. देशांतर्गत व्यवहारांतून १५.३ टक्क्यांनी वाढ झाली असून, आयात ४.३ टक्क्यांनी खाली आल्याने महसुलात मोठी वाढ झाली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाचे एकूण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन मे महिन्यात १.७३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. देशांतर्गत व्यवहारातून वाढलेल्या महसुलामुळे आणि आयात कमी झाल्यामुळे त्यात वार्षिक दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे अर्थमंत्रालयाने आज सांगितले.

एप्रिलमध्ये ‘जीएसटी’ संकलनाने २.१० लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. देशांतर्गत व्यवहारांतून १५.३ टक्क्यांनी वाढ झाली असून, आयात ४.३ टक्क्यांनी खाली आल्याने महसुलात मोठी वाढ झाली आहे, असेही अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. परतावा दिल्यानंतर, मे महिन्यातील निव्वळ ‘जीएसटी’ महसूल १.४४ लाख कोटी रुपये असून, मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात ६.९ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

आर्थिक वर्ष २०२५ मध्ये मे २०२४ पर्यंत एकूण ‘जीएसटी’ संकलन ३.८३ लाख कोटी होते. वर्षभरात त्यात ११.३ टक्के वाढ झाली असून, देशांतर्गत व्यवहारांमध्ये १४.२ टक्क्यांनी झालेली वाढ आणि आयातीत झालेली किरकोळ १.४ टक्क्यांची वाढ यामुळे ही वाढ झाली आहे. परताव्यानंतर, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मे २०२४ पर्यंत निव्वळ ‘जीएसटी’ महसूल ३.३६ लाख कोटी रुपये आहे, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात ११.६ टक्के वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT