GST collection in October rises 13 percent to Rs 1.72 crore  Sakal
Personal Finance

GST Collection: दिवाळीपूर्वी सरकारी तिजोरीत पैशांचा पाऊस, जीएसटी संकलन 1.72 लाख कोटींवर

GST Collection: केंद्र सरकारकडून नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी चांगली बातमी आली आहे.

राहुल शेळके

GST Collection: केंद्र सरकारकडून नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी चांगली बातमी आली आहे. अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर 2023 साठी जीएसटी संकलनाची आकडेवारी आज म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी जाहीर केली. या आकडेवारीनुसार एकूण वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 13 टक्क्यांनी वाढून 1.72 लाख कोटी रुपये झाले आहे.

गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये, वित्त मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली होती आणि सांगितले होते की FY 24 च्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) GST संकलनात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जीएसटी संकलन 11 टक्क्यांनी वाढून 9.92 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले होते.

काय आहेत जीएसटीचे आकडे?

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि वर्षभरात नोंदलेली ही विक्रमी वाढ आहे. ऑक्टोबरच्या या आकडेवारीसह, चालू आर्थिक वर्षातील मासिक संकलनाची सरासरी 1.66 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 11 टक्के अधिक आहे.

जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात जीएसटीद्वारे एकूण 1,72,003 कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यापैकी 30,062 कोटी रुपये CGST म्हणून, 38,171 कोटी रुपये SGST म्हणून आणि 91,315 कोटी रुपये IGST म्हणून जमा झाले आहेत.

चालू आर्थिक वर्षातील सर्वाधिक संकलनाची नोंद एप्रिलमध्ये झाली असून एकूण संकलनाने 1.8 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. जे आजपर्यंतचे सर्वात जास्त संकलन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT