GST enforcement action likely to fetch over Rs 50,000 crore in FY24  Esakal
Personal Finance

GST Evasion: कर वसुलीनंतर मोदी सरकार होणार मालामाल! मिळणार तब्बल ‘इतके’ कोटी रुपये

GST Evasion: चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत जीएसटी अधिकाऱ्यांना 1.36 लाख कोटी रुपयांची करचोरी आढळून आली आहे.

राहुल शेळके

GST Evasion: चालू आर्थिक वर्षात उघडकीस आलेल्या वस्तू आणि सेवा कर (GST) चोरीच्या प्रकरणांमधून सरकारला 50,000 कोटींहून अधिक रक्कम वसूल होण्याची अपेक्षा आहे. ही रक्कम गेल्या आर्थिक वर्षात केलेल्या वसुलीच्या दुप्पट असेल. अधिकाऱ्यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितले की, या वर्षात आतापर्यंतचे हे सर्वात मोठे कर संकलन असू शकते.

चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत जीएसटी अधिकाऱ्यांना 1.36 लाख कोटी रुपयांची करचोरी आढळून आली आहे. त्यापैकी 14,108 कोटी रुपये वसूल झाले आहेत. आर्थिक वर्ष 23 मध्ये 1.01 लाख कोटी रुपयांची करचोरी आढळून आली, त्यापैकी 21,000 कोटी रुपये वसूल करण्यात आले. अनेक विमा कंपन्यांनी इनपुट टॅक्स क्रेडिटचा चुकीचा दावा केला होता.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या वर्षी फसवणूक करणाऱ्यांनी अनेक पद्धतीने करचोरी करण्याचा प्रयत्न केला होता. उदाहरणार्थ, त्यांनी कमी कर भरण्यासाठी चुकीच्या पद्धतीने सवलती घेतल्या होत्या. याशिवाय त्यांनी चुकीच्या पद्धतींचा अवलंब करून इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला.

अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारने करचोरी रोखण्यासाठी आपापल्या स्तरावर विशेष मोहिमा राबवल्या होत्या. यामुळे कर वसुलीचे आकडेही वाढतील.

गेल्या काही महिन्यांत अनेक ई-गेमिंग कंपन्यांना कर भरण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. या नोटिसांमध्ये करचुकवेगिरीचे दावे करण्यात आले होते.

कर अधिकार्‍यांचे मत आहे की ई-गेमिंगवर 28 टक्के कर लावला पाहिजे. ड्रीम 11, गेम्सक्रिप्ट सारख्या ऑनलाइन गेमिंग कंपन्यांनी सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT