GST sakal
Personal Finance

GST : ‘जीएसटी’ १.७२ लाख कोटींवर ; आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च मासिक करसंकलन

जानेवारी महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल एक लाख ७२ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जानेवारी २०२२ च्या तुलनेत त्यात १०.४ टक्के वाढ झाली आहे. हे आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च मासिक संकलन आहे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जानेवारी महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल एक लाख ७२ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जानेवारी २०२२ च्या तुलनेत त्यात १०.४ टक्के वाढ झाली आहे. हे आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च मासिक संकलन आहे, अशी माहिती आज अर्थ मंत्रालयाने दिली.

चालू आर्थिक वर्षात १.७० लाख कोटींपेक्षा अधिक करसंकलनाची ही तिसरी वेळ आहे. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या दहा महिन्यांच्या कालावधीसाठी एकूण १६.६९ लाख कोटी रुपये ‘जीएसटी’ जमा झाला असून, त्यात वार्षिक ११.६ टक्के वाढ झाली आहे.

मागील वर्षाच्या याच कालावधीत म्हणजे एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान १४.९६ लाख कोटी रुपये कर जमा झाला होता. जानेवारीत जमा झालेल्या एकूण ‘जीएसटी’मध्ये ४३,५५२ कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी), तर ३७,२५७ कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी) यांचा समावेश आहे.

एप्रिल २०२३ मध्ये १.८७ लाख कोटी रुपयांचे आतापर्यंतचे सर्वाधिक मासिक ‘जीएसटी’ संकलन नोंदवले गेले होते. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये अर्थव्यवस्था सात टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे, असे अर्थ मंत्रालयाने एका आढाव्यात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT