Gujarat International Finance Tech-City Financial Services Centre sakal
Personal Finance

Gujarat International Finance Tech-City : मोदींची गिफ्ट सिटी : ‘गिफ्ट-निफ्टी’चा आरंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिका भेटीमध्ये विविध उद्योगांच्या प्रमुखांबरोबर भारतात गुंतवणूक वाढावी म्हणून संवाद साधला

कौस्तुभ केळकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिका भेटीमध्ये विविध उद्योगांच्या प्रमुखांबरोबर भारतात गुंतवणूक वाढावी म्हणून संवाद साधला

Gujarat International Finance Tech-City : गुजरातमधील गांधीनगर येथे गुजरात सरकार आणि विविध कंपन्यांच्या संयुक्त प्रयत्नातून गिफ्ट (जीआयएफटी) म्हणजे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी हे एक व्यापारी शहर उभारण्यात आले आहे.

हे एक आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र असून, या ठिकाणी माहिती-तंत्रज्ञान, आर्थिक, क्षेत्रातील उद्योगांना अनुकूल अशा पायाभूत सुविधा येथे उभारण्यात आल्या आहेत. येथे आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यापारी केंद्र आणि विशेष निर्यात उद्योग केंद्र स्थापन करण्यात आले असून, देशांतर्गत उद्योगांना पहिली दहा वर्षे प्राप्तिकरात सवलत देण्यात आली आहे;

तसेच उद्योगांना नोंदणी फी, मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले असून, अनेक करसवलती देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिका भेटीमध्ये विविध उद्योगांच्या प्रमुखांबरोबर भारतात गुंतवणूक वाढावी म्हणून संवाद साधला होता. याला प्रतिसाद देत गूगलने गिफ्ट सिटीमध्ये वित्तीय सेवा क्षेत्रासाठी माहिती तंत्रज्ञान केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे.

‘गिफ्ट-निफ्टी’ व्यवहार सुविधा

निफ्टी म्हणजे ‘एनएसई ५०’ हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) असून, हा जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. निफ्टीचे वायदा व्यवहार (डेरिव्हेटिव्ह काँट्रॅक्ट्स) ‘एसजीएक्स’वर (सिंगापूर स्टॉक एक्स्चेंज) होतात.

आता हे व्यवहार आजपासून म्हणजे तीन जुलै २०२३ पासून गिफ्ट सिटीमध्ये सुरू होतील. हे व्यवहार सकाळी ६.३० ते ३.४० पर्यंत आणि संध्याकाळी ४.३५ ते रात्री २.४५ वाजेपर्यंत होतील.

यासाठी एनएसई आणि एसजीएक्स यांच्यामध्ये ‘एनएसई आयएसएफसी-एसजीएक्स कनेक्ट’ ही एक खास व्यवस्था करण्यात आली आहे.

निफ्टीच्या वायदा व्यवहारांचा व्यवसाय आपल्या देशात यावा यासाठी एनएसई आणि एसजीएक्स यांच्यात गेले चार वर्षे वाटाघाटी सुरू होत्या. परंतु, हा तिढा सुटत नव्हता, अखेरीस लवादामार्फत तो सोडवण्यात आला.

‘गिफ्ट निफ्टी’च्या व्यवहारांचा फायदा

गिफ्ट सिटीमध्ये निफ्टीच्या वायदा व्यवहारांवरील कर आणि व्यवहारांचे शुल्कसुद्धा ‘एसजीएक्स’च्या तुलनेत कमी असल्याने परकी गुंतवणूकदारांना येथे व्यवहार करणे किफायतशीर ठरेल आणि यातून एकंदर व्यवहारांचा आकार (व्हॉल्युम) वाढेल.

काही काळ तरी देशातील गुंतवणूकदारांना गिफ्ट सिटीमध्ये निफ्टीचे वायदा व्यवहार करता येणार नाहीत.

‘एनएसई’वर सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० या काळातच व्यवहार सुरू असतात आणि बाजार संपल्यानंतर जागतिक पातळीवरील विविध आर्थिक घडामोडी, भू-राजकीय घटना यांची दखल आपल्याला घेता येत नाही. परिणामी, दुसऱ्या दिवशी बाजार उघडल्यावर मोठे चढ-उतार होतात.

परंतु, गिफ्ट सिटीमध्ये निफ्टीचे वायदा व्यवहार दिवसांतील २२ तास सुरू राहतील आणि याद्वारे जागतिक पातळीवरील विविध घटनांची दखल निफ्टीच्या वायदा व्यवहारांमध्ये घेता येईल आणि पर्यायाने यातून आपल्या बाजारातील चढ-उतार कमी होण्यास मदत होईल. थोडक्यात, विविध गुंतवणूकदारांना दिवसातील बहुसंख्य वेळ निफ्टीची दिशा काय आहे, हे समजण्यास मोठी मदत होईल.

(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT