Jobs in IT Sakal
Personal Finance

Jobs in IT: आनंदाची बातमी! आयटी कंपनी देणार 10 हजारांहून अधिक फ्रेशर्सना नोकरी

Jobs in IT: मोठ्या आयटी कंपन्यांमधील रोजगाराच्या संधी कमी होऊ लागल्या आहेत. मार्च तिमाहीत जवळपास सर्व मोठ्या आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र मार्च तिमाहीत HCL टेकच्या कर्मचाऱ्यांची संख्या 2,725 ने वाढली आहे.

राहुल शेळके

Jobs in IT: मोठ्या आयटी कंपन्यांमधील रोजगाराच्या संधी कमी होऊ लागल्या आहेत. मार्च तिमाहीत जवळपास सर्व मोठ्या आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र मार्च तिमाहीत HCL टेकच्या कर्मचाऱ्यांची संख्या 2,725 ने वाढली आहे.

31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीनंतर देशातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनीमधील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 2 लाख 27 हजार 481 झाली आहे. यापूर्वी, 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीनंतर, एचसीएल टेकच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2 लाख 24 हजार 756 होती.

यातच आता आयटी कंपनी एचसीएल टेक तरुणांना मोठी संधी देणार आहे. कंपनीने गेल्या वर्षीप्रमाणेच 2024-24 या आर्थिक वर्षात 10,000 हून अधिक फ्रेशर्सची भरती करणार असल्याचे जाहीर केले. कंपनीच्या या घोषणेमुळे तरुणांमध्ये उत्साह वाढला आहे.

संपूर्ण उद्योगात नोकऱ्या कमी होत असताना तिसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. देशातील सर्वात मोठ्या पाच आयटी कंपन्यांमध्ये, एचसीएल टेक वगळता, कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. सर्वात मोठी IT कंपनी TCS असो किंवा विप्रो असो, कर्मचाऱ्यांची संख्या अलीकडच्या काही महिन्यांत कमी झाली आहे.

IT क्षेत्रातील सर्वात मोठी आणि देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी TCS ने मार्च तिमाहीत 1,759 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे, तर TCS कर्मचाऱ्यांची संख्या संपूर्ण आर्थिक वर्षात 13 हजार 249 ने कमी झाली आहे.

गेल्या आर्थिक वर्षातही आयटी कंपन्यांना कमकुवत मागणीचा सामना करावा लागला. येत्या वर्षासाठी कंपन्यांचे अंदाजही चांगले नाहीत. इन्फोसिसचा असा विश्वास आहे की 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या चालू आर्थिक वर्षात त्यांच्या महसुलात 1 ते 3 टक्क्यांनी किरकोळ वाढ होऊ शकते. जून तिमाहीत विप्रोच्या महसुलात 1.5 टक्के घट होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT