HDFC Bank Sakal
Personal Finance

HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का, कर्ज झाले महाग, जाणून घ्या किती वाढणार EMI

HDFC Bank Hikes MCLR: नवीन दर 7 सप्टेंबर 2023 पासून लागू झाले आहेत.

राहुल शेळके

HDFC Bank Hikes MCLR: तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल आणि कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल किंवा तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

HDFC बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेने आपल्या ग्राहकांसाठी कर्जे महाग केली आहेत. नवीन दर 7 सप्टेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. म्हणजेच जन्माष्टमीला व्याजदर वाढवण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.

(HDFC Bank Hikes Interest Rates)

HDFC बँकेने बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) दर 15 बेस पॉइंट्स किंवा 0.15 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. हे वाढलेले दर काल, 7 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.

म्हणजेच ग्राहकांना EMI चा हप्ता जास्त द्यावा लागणार आहे. आता ग्राहकांना एचडीएफसी होम लोन, कार लोन, पर्सनल लोन इत्यादींवर जास्त खर्च करावा लागणार आहे.

बँकेकडून रात्रीचा MCLR 8.35 टक्क्यांवरून 8.50 टक्क्यांनी 15 बेस पॉईंटने वाढवला आहे. बँकेचा एक महिन्याचा MCLR 8.45 टक्क्यांवरून 10 बेस पॉईंटने ने वाढून 8.55 टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे तीन महिन्यांचा MCLR 8.70 टक्क्यांवरून 8.80 टक्क्यांवर पोहोचला आहे. सहा महिन्यांचा MCLR 8.95 वरून 9.05 पर्यंत वाढवला आहे.

याशिवाय, सर्व कर्जांशी जोडलेला एक वर्षाचा MCLR दर 5 बेस पॉईंटने 9.10 टक्क्यांवरून 9.15 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी MCLR 5 बेस पॉईंटने वाढवून अनुक्रमे 9.20 टक्के आणि 9.25 टक्के केले आहे. अशा प्रकारे बँकेने सर्व मुदतीची कर्जे महाग केली आहेत.

MCLR वाढल्यामुळे कर्जे का महाग होतात?

MCLR ही भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेली एक पद्धत आहे, ज्याच्या आधारे बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. त्याआधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित करत होत्या. MCLR मध्ये, बँकांसाठी कर्ज देण्यासाठी किमान व्याज दर निश्चित केला जातो. MCLR वाढल्यानंतर त्याचा थेट परिणाम ग्राहकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरांवर होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT