HDFC Bank FD Rate Sakal
Personal Finance

HDFC Bank: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFCने ग्राहकांना दिली भेट! अर्थसंकल्पानंतर FDवरील व्याजदर वाढवले

HDFC Bank FD Rate: तुमचेही एचडीएफसी बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अर्थसंकल्पानंतर देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेने एफडीचे दर वाढवले ​​आहेत. बँकेने ठराविक कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे.

राहुल शेळके

HDFC Bank FD Rate: तुमचेही एचडीएफसी बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अर्थसंकल्पानंतर देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेने एफडीचे दर वाढवले ​​आहेत. बँकेने ठराविक कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. बँकेने 3 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींच्या दरात 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर ग्राहकांना FD वर जास्त परतावा मिळेल.

बँक 4 वर्षे 7 महिन्यांत म्हणजेच 55 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD साठी 7.40 टक्के व्याजदर देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90 टक्के परतावा देत आहे. बँकेने वाढवलेले नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

FDचे नवीन दर

बँक 7 ते 29 दिवसांच्या कालावधीत मुदत ठेवींवर सर्वसामान्यांना 3% व्याज दर देत आहे. 30 ते 45 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 3.50% व्याज दिले जात आहे, तर 46 दिवस ते सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.50% व्याज दिले जात आहे.

6 महिन्यांच्या FD वर तुम्हाला किती परतावा मिळेल?

बँक सहा महिन्यांपेक्षा जास्त आणि नऊ महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 5.75% व्याजदर देत आहे. बँक नऊ महिने ते एक दिवस आणि एका वर्षापेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर 6% व्याज देत आहे.

एक वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 6.60% व्याजदर देत आहे, तर 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.10% देत आहे. HDFC बँक 21 महिने ते दोन वर्षे आणि अकरा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 7% व्याज देत आहे.

'या' मुदत ठेवींचे दर वाढले आहेत

HDFC बँकेने 2 वर्षे 11 महिने किंवा 35 महिन्यांच्या FD मध्ये 20 बेसिक पॉइंट्सने वाढ केली आहे, त्यानंतर त्यावरील व्याजदर 7.15 टक्क्यांवरून 7.35 टक्के झाला आहे. याशिवाय, बँकेने 4 वर्षे, 7 महिने किंवा 55 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर व्याजदर वाढवला आहे, त्यानंतर तो 7.20% वरून 7.40% झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT