HDFC Bank IPO Sakal
Personal Finance

HDFC Bank IPO : एचडीएफसी बँक आणखी एक आयपीओ आणायच्या तयारीत, उपकंपनीला करणार लिस्ट...

एचडीएफसी बँकेने तिची आणखी एक उपकंपनी, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस (HDB Financial Services) शेअर बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

एचडीएफसी बँकेने तिची आणखी एक उपकंपनी, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस (HDB Financial Services) शेअर बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने शनिवारी ही माहिती दिली आहे. एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) लाँच करणार आहे असे एचडीएफसी बँकेने सांगितले.

याशिवाय, बँकेने असेही म्हटले आहे की ते आयपीओ प्रक्रियेच्या बाहेर एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसमधील हिस्सेदारी विकण्याची शक्यता तपासणार आहे. बँकेच्या बोर्डाने 20 जुलैला झालेल्या बैठकीत एचडीबी फायनान्शियलचा आयपीओ लॉन्च करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली आहे असे एचडीएफसी बँकेने एका निवेदनात म्हटले आहे. आयपीओशी संबंधित सर्व आवश्यक अटी सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण झाल्या पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.

सध्या, एचडीएफसी बँकेकडे एचडीबी फायनान्शियलमध्ये 94.6 टक्के हिस्सा आहे. एचडीबी फायनान्शियल हे देशातील सर्वात मोठे नॉन-बँकिंग लेंडर्सपैकी एक आहे. पर्सनल लोनव्यतिरिक्त, ते स्मॉल आणि मायक्रो एन्टरप्रायझेसना विविध प्रकारचे कर्ज आणि वित्तीय सेवा देखील प्रदान करते.

एचडीबी फायनान्शियलचा एकूण महसूल 2024 मध्ये वाढून 14,171 कोटी झाला, जो मागील आर्थिक वर्षात 12,402 कोटी होता. त्याच वेळी, कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2024 मध्ये 2,460 कोटीपर्यंत वाढला, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 1,959 कोटी होता.

एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. बँकेने शनिवारी जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. जून तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 35.3% ने वाढून 16,174.75 कोटी झाला आहे जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 11,951.77 कोटी होता.

पण, बँकेच्या नफ्यात तिमाही आधारावर 2% ने घट झाली आहे कारण मार्च तिमाहीत तिचा निव्वळ नफा 16,510 कोटी होता. त्याच वेळी, बँकेचे नेट इंटरेस्ट इनकम (NII) तिमाही आधारावर 2.6 टक्क्यांनी वाढून 29,837.1 कोटी झाले आहे. तर इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न देखील तिमाही आधारावर 16 टक्क्यांनी वाढून 10,668 कोटी झाले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT