HDFC Ltd and HDFC Bank merger will investors benefit finance
HDFC Ltd and HDFC Bank merger will investors benefit finance  Sakal
Personal Finance

HDFC Ltd and HDFC Bank Merger : एचडीएफसी द्वयीच्या विलीनीकरणानंतर...

गोपाळ गलगली

एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बँक हे सध्या शेअर बाजारातील दोन तळपते तारे आहेत. या दोनही कंपन्या गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत. लवकरच त्यांचे विलिनीकरण होऊन एक बलाढ्य कंपनी अस्तित्वात येईल. त्याचा गुंतवणूकदारांना काय फायदा होईल, याचा आढावा येथे घेतला आहे. सुरुवातीला या दोन कंपन्यांची माहिती जाणून घेऊया.

विलीनीकरणाचे प्रमाण

एचडीएफसी लि.च्या भागधारकांना २५ शेअरमागे एचडीएफसी बँकेचे ४२ शेअर मिळणार आहेत. यामुळे विलीनीकरणानंतर एचडीएफसी भागधारकांची बँकेमधील मालकी ४१ टक्के राहणार आहे. मात्र, बँक १०० टक्के सार्वजनिक राहणार आहे. भागधारकांकडे २५ पेक्षा कमी शेअर असल्यास, शेअर न मिळता, ठरलेल्या दिवशी त्या शेअरचा जो भाव असेल त्याप्रमाणे पैसे मिळणार आहेत.

फायदे काय?

या विलीनीकरणानंतर भागधारकांना होणारा मुख्य फायदा म्हणजे बँकेचा सेव्हिंग आणि करंट रेशो वाढणार असल्याने बँकेची एकूण गृहकर्जाची मर्यादा ११ टक्क्यांवरुन ३३ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ २०० टक्के आहे.

व्याज उत्पन्नाचे प्रमाण ३.७ टक्के ते ३.८ टक्क्यांच्या दरम्यान रहाण्याची अपेक्षा आहे. दुसरा मोठा फायदा म्हणजे ग्राहकसंख्या १० कोटींहून होण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच वर्षांत बँकेच्या १५०० नव्या शाखा उघडण्याची योजना आहे. विलीनीकरणामुळे उत्पन्न; तसेच खर्चाच्या प्रमाणातही वाढीची शक्यता आहे.

विलीनीकरणानंतर शेअरचा भाव

विलीनीकरणाआधी या दोन्ही कंपन्यांचे शेअर अगदी मजबूत स्थितीत आहेत. विलीनीकरणामुळे बँकेचा पसारा वाढणार आहे. त्यामुळे बँकेच्या शेअरमध्ये वाढीची शक्यता आहे. शेअरच्या

२५:४२ या प्रमाणामुळे बँकेची शेअर संख्या त्याप्रमाणात वाढणार आहे. परंतु, बँकेचा नफा त्या प्रमाणात वाढायला वेळ लागणार आहे. त्यामुळे सुरुवातीला शेअरचा भाव खाली येण्याची शक्यता आहे. याशिवाय या विलीनीकरणाला ‘एमएससीआय’ या कंपनीने ०.५ टक्क्यांनी ‘वेटेज’ कमी दिल्यामुळे काही प्रमाणात एचडीएफसी लि.मधील गुंतवणूक बाहेर पडण्याची शक्यता आहे.

आगामी अंदाज

काही विश्‍लेषकांच्या अंदाजानुसार एचडीएफसी बँकेच्या शेअरच्या भावात काही बदल अपेक्षित आहेत.

सारांश : एचडीएफसी बँक विलीनीकरणानंतर अशाप्रकारे मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. भारताच्या आर्थिक भरभराटीची ती साक्षीदार ठरणार आहे. मुख्य एचडीएफसी लि.कंपनी आपला बळी देऊन अस्तंगत पावणार आहे. मात्र, गुंतवणूकदारांची हीच इच्छा राहणार आहे, की एचडीएफसी लि. कंपनीने दुसऱ्या रुपात प्रगट होउन गुंतवणूकदारांबरोबरच देशाची सेवा करत राहावे. कारण ‘एचडीएफसी’ शब्दातच जादू आणि विश्वासही आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT